Homeउद्योगसिडको परिसरातून विविध गुन्ह्यातील सराईत आरोपीला अटक शहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कारवाई

सिडको परिसरातून विविध गुन्ह्यातील सराईत आरोपीला अटक शहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कारवाई

सराईत अविनाश राऊसाहेब वाणी हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे दिसून आले.. त्याच्यावर शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर आणि हत्यारे बाळगणारे, दहशत निर्माण करणारे, सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.

त्यानुसार तपास करत असताना दि.25 जुलै 2025 रोजी नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पोह. प्रशांत मरकड व विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली की, सराईत आरोपी अविनाश वाणी हा गावठी कट्टा/पिस्तूल जवळ बाळगुन शहरातील सिडकोत दत्तचौक, अंबड परीसरात नागरीकांमध्ये फिरत असून तो तिथे दहशत माजवत आहे. ही माहिती खात्रीशिर असल्याचे समजताच, ही बातमी शहर गुन्हे शाखा युनिट-1 चे वपोनि. मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि. वेतन श्रीवंत, पोह. प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, नाजीमखान पठाण, अमोल कोष्टी, सुक्राम पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार सिडकोतील डॉ.बाबासाहेब आंबडेकर स्टेडियम, दत्तचौक येथे तपास करून आरोपीस पथकाने पकडुन ताब्यात घेतले. आरोपीचे पूर्ण नाव अविनाश राऊसाहेब वाणी (वय-30) रा. रविवारी पेठ, चांदीच्या गणपतीच्या मागे, रविवार कारंजा, नाशिक असे असल्याचे समजले त्याच्याकडून 30 हजार रूपये किंमतीचे देशी पिस्तूल, एक जिवंत काडतुस किंमत 500 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सराईत अविनाश राऊसाहेब वाणी हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे दिसून आले त्याचेविरूध्द 1) गंगापुर पोलीस ठाणे गुरनं 180/2016, 2) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं 136/2016, 3) पंचवटी पोलीस ठाणे गुरनं 257/2016, 4) पंचवटी पोलीस ठाणे गुरनं 263/2018 हे गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर आता अंबड पोलीस ठाण्यात भा.ह.का. कलम 3/25 सह म.पो.का.कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाकरता आरोपीस अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, गुन्हेशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून मिळून करण्यात आली. पथकात रोहिदास लिलके, जगेश्वर बोरसे, मपोअं. अनुजा येलवे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!