Homeक्राईमतडीपार सराईत गुन्हेगाराला कॉलेजरोड येथून अटक; नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 ची...

तडीपार सराईत गुन्हेगाराला कॉलेजरोड येथून अटक; नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी..

आडगाव व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यात फरार आरोपी, दोन वर्षासाठी तडीपार सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात गुन्हेशाखा युनिट-1 ला यश

पोलीस वार्ता, नाशिक : मा.पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक, मा.श्री.प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त गुन्हेशाखा, मा.श्री.संदिप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक यांनी नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या इसमांचा शहरात शोध घेवून ते सापडल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्याच अनुषगाने दि.17 मार्च 2025 रोजी गुन्हेशाखा युनिट-1 नाशिक यात कार्यरत असलेले पोहवा प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे कडुन हद्दपार करण्यात आलेला इसम वेदांत संजय चाळगे हा शहरातील एच.पी.टी. कॉलेजच्या समोर म्हणजेच कॉलेजरोड, नाशिक या ठिकाणी उभा असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली, मरकड यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मधुकर कड साहेब यांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रविंद्र बागुल, पोहवा प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, योगीराज गायकवाड, नाझीम पठाण, पोना. विशाल देवरे, वापोअं. समाधान पवार मपोअं/अनुजा येलवे यासर्वांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीप्रमाणे एच.पी.टी. कॉलेजचे समोर कॉलेजरोड येथे गेले असता कॉलेजच्या गेटवर वेदांत चाळगे हा उभा असलेला दिसला तेव्हा पोलिसांनी धाव घेताच, त्याला चाहुल लागल्याने तो पळून जावु लागला पोलीस त्याचा पाठलाग करत होते पुढे तो पळत डॉन बॉस्को या शाळेच्या कंपाऊंड मध्ये उडी मारून दुसऱ्या बाजूने पुन्हा कंपाऊंडच्या बाहेर पडून समोर सुरज संकुल अपार्टमेंट मध्ये शिरला त्याठिकाणी शिताफिने पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले, त्याचे नाव विचारले असता त्याने वेदांत संजय चाळगे, वय-२०वर्षे, रा-राहुल नगर, तिडके कॉलनी, सेंट फान्सीस शाळे शेजारी, अंबकरोड, नाशिक अशी माहिती दिली.

सदर गुन्हेगारास नाशिक शहर ह‌द्दीतुन 2 वर्षासाठी तडीपार/हद्दपार केलेले आहे तरी हा वावरतांना शहरात दिसून येतोय म्हणून त्याला पुढील कारवाईकामी गंगापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तडीपार वेदांत संजय चाळगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सरकारवाडा व आडगाव पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत..
  • सदरचे गुन्हे त्याने तडीपार कालावधी दरम्यान केलेले आहेत,

१) सरकारवाडा पोस्टे गुरनं. १९९/२०२४ भा.न्या.सं. कलम १८९(२), २२३ सह मपोका १३५ प्रमाणे
२) सरकारवाडा पोस्टे गुरनं. ४३/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०९(४), ७४, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) सह भा. हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे
३) आडगाव पोस्टे गुरनं. ४६/२०२५ भा. न्या.सं. कलम ३१० (२)(५), ३०८(४), ११५(२), ५१(३), ३५२, ३२४(४),
१८९(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), मपोका १३५ अशा ०३ गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे गुन्हे त्याने तडीपार कालावधी दरम्यान केलेले आहेत.

  • तसेच यापूर्वी देखील त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन हददीत खालील नमुद गुन्हे दाखल आहेत..

१) सरकारवाडा पोस्टे गुरनं. १३/२०२३ भादवि कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे
२) सरकारवाडा पोस्टे गुरनं. २६/२०२३ भादवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, २०१ प्रमाणे
३) सरकारवाडा पोस्टे गुरनं. २९/२०२३ आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे
४) सरकारवाडा पोस्टे गुरनं. १६०/२०२३ भादविक ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३३६, ३२३, ५०४, आर्म ॲक्ट ४/२५ सह मपोका १३५ प्रमाणे
५) सरकारवाडा पोस्टे गुरनं. ३२२/२०२४ भादवि मपोका १४२ प्रमाणे..

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!