आडगाव व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यात फरार आरोपी, दोन वर्षासाठी तडीपार सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात गुन्हेशाखा युनिट-1 ला यश

पोलीस वार्ता, नाशिक : मा.पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक, मा.श्री.प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त गुन्हेशाखा, मा.श्री.संदिप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक यांनी नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या इसमांचा शहरात शोध घेवून ते सापडल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्याच अनुषगाने दि.17 मार्च 2025 रोजी गुन्हेशाखा युनिट-1 नाशिक यात कार्यरत असलेले पोहवा प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे कडुन हद्दपार करण्यात आलेला इसम वेदांत संजय चाळगे हा शहरातील एच.पी.टी. कॉलेजच्या समोर म्हणजेच कॉलेजरोड, नाशिक या ठिकाणी उभा असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली, मरकड यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मधुकर कड साहेब यांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रविंद्र बागुल, पोहवा प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, योगीराज गायकवाड, नाझीम पठाण, पोना. विशाल देवरे, वापोअं. समाधान पवार मपोअं/अनुजा येलवे यासर्वांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीप्रमाणे एच.पी.टी. कॉलेजचे समोर कॉलेजरोड येथे गेले असता कॉलेजच्या गेटवर वेदांत चाळगे हा उभा असलेला दिसला तेव्हा पोलिसांनी धाव घेताच, त्याला चाहुल लागल्याने तो पळून जावु लागला पोलीस त्याचा पाठलाग करत होते पुढे तो पळत डॉन बॉस्को या शाळेच्या कंपाऊंड मध्ये उडी मारून दुसऱ्या बाजूने पुन्हा कंपाऊंडच्या बाहेर पडून समोर सुरज संकुल अपार्टमेंट मध्ये शिरला त्याठिकाणी शिताफिने पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले, त्याचे नाव विचारले असता त्याने वेदांत संजय चाळगे, वय-२०वर्षे, रा-राहुल नगर, तिडके कॉलनी, सेंट फान्सीस शाळे शेजारी, अंबकरोड, नाशिक अशी माहिती दिली.

सदर गुन्हेगारास नाशिक शहर हद्दीतुन 2 वर्षासाठी तडीपार/हद्दपार केलेले आहे तरी हा वावरतांना शहरात दिसून येतोय म्हणून त्याला पुढील कारवाईकामी गंगापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तडीपार वेदांत संजय चाळगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सरकारवाडा व आडगाव पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत..
-
सदरचे गुन्हे त्याने तडीपार कालावधी दरम्यान केलेले आहेत,
१) सरकारवाडा पोस्टे गुरनं. १९९/२०२४ भा.न्या.सं. कलम १८९(२), २२३ सह मपोका १३५ प्रमाणे
२) सरकारवाडा पोस्टे गुरनं. ४३/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०९(४), ७४, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) सह भा. हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे
३) आडगाव पोस्टे गुरनं. ४६/२०२५ भा. न्या.सं. कलम ३१० (२)(५), ३०८(४), ११५(२), ५१(३), ३५२, ३२४(४),
१८९(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), मपोका १३५ अशा ०३ गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे गुन्हे त्याने तडीपार कालावधी दरम्यान केलेले आहेत.

-
तसेच यापूर्वी देखील त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन हददीत खालील नमुद गुन्हे दाखल आहेत..




































