स्वामित्व योजनेअंतर्गत नव्याने नगर भूमापनाचे काम करून नविन गावठाणांच्या तयार केलेल्या सनद व मिळकत पत्रिका वितरणाचा कार्यक्रम बारामती तालुकास्तरावर घेण्यात आला.

पोलीस वार्ता, बारामती : केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात जवळपास 50 हजार गावांमध्ये 58 लाख मिळकत पत्रिका वाटप करणे व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर शनिवारी दि.18 जानेवारी रोजी देशभरात कार्यक्रम झाले.
याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख, विभाग व सर्व्हे ऑफ इंडिया यांनी मिळून केलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत नव्याने नगर भूमापनाचे काम करून नविन गावठाणांच्या तयार केलेल्या सनद व मिळकत पत्रिका वितरणाचा कार्यक्रम बारामती तालुकास्तरावर घेण्यात आला. बारामती तालुक्यातील स्वामित्व योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या 48 गावांपैकी 45 गावांमध्ये ड्रोनद्वारे मोजणी केली गेली. नगर भूमापन चौकशी करून 7672 नविन मिळकत पत्रिका व सनदा तयार करण्यात आलेल्या आहेत.

-
शनिवारी योजनेअंतर्गत नव्याने..




































