भुसावळ – तालुक्यातील वरणगांव येथील महिलांना ” महिला बाल संगोपन केंद्रात ” नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयात हडप केल्याचे प्रकरण ता.२४ रोजी उघडकीस आले.याबाबत फसवणूक झालेल्या महिलांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांची भेट घेतली.
विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रुखमाई को – ऑफ सोसायटीचे तिसऱ्या मजल्यावर प्रशांत अग्रवाल सह याचे काही साथीदारांनी कित्येक वर्षे कार्यालय सुरू ठेवून सरकारी नोकरी लावून देण्याचे रॅकेट चालविले व नोकरी लावून देण्यासाठी अमिष दाखवून पैसे स्वीकारले ? वातानुकूलित कार्यालय तसेच प्रशांत अग्रवाल याने परिधान केलेले सोन्याचे आभूषणे पाहून अनेक जण बळी पडले व वेळोवेळी पैसे देवून फसले.सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आला असून संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास अटक करण्यात आली.न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यादरम्यान वरणगांव येथील महिलांना प्रशांत अग्रवाल यास अटक झाल्याचे कळताच बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेवून महिला बाल संगोपन केंद्रात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये घेतले संदर्भात माहिती दिली.
सदरील महिलांची फसवणूक झाले बाबत सर्व माहिती निरीक्षकांनी ऐकून घेतली व वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याची माहिती फसवणूक झालेल्या महिलांनी दिली.असे महाराष्ट्र भरातून अनेकांची सरकारी नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारपेठ ठाण्यात कसून चौकशी सुरू
सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाली आहे.या संदर्भात फसवणूक झालेले इसम पोलीस स्टेशनला संपर्क साधता असल्याने त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यांची कसून चौकशी करीत प्रकरणे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.


























