Homeसामाजिकसफाई कर्मचारी मागण्या मान्य न झाल्यास ; आमरण उपोषणचा इशारा !

सफाई कर्मचारी मागण्या मान्य न झाल्यास ; आमरण उपोषणचा इशारा !

भुसावळ – शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या वाढीव क्षेत्रफळाचा विचार करून त्या प्रमाणात नगरपरिषदेत सफाई कामगारांची संख्या एक चतुर्थांश अर्थात अत्यल्प असल्याने हल्ली अस्तित्वात असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून ४ सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा भार एका कर्मचाऱ्याकडून उचलला जात आहे. तसेच सफाई कामगार हे शहरातील सर्वात महत्वाचा घटक असूनही त्यांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्या तसेच न्याय व हक्कांसाठी अभ्यासपूर्ण लक्ष देऊन संवैधानिक मार्गाने लढा देण्यासाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांनी वेळोवेळी नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयातील प्रशासनाकडे अविरत पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. तरीही भुसावळ नगरपरिषद प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या विविध मागण्या या दिर्घकाळ प्रलंबित असल्याने भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांची आज त्यांच्या दालनात संतोष थामेत यांनी भेट घेतल्यानंतर निवेदन देऊन सदरील मागण्या लवकर मान्य करून उचित कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे.

बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा

यासंदर्भात आज मुख्याधिकारी यांनी प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून दोन दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसानंतर याबाबत उचित कार्यवाही होऊन मार्ग न निघाल्यास किंवा मागण्या मान्य न झाल्यास अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमारजी वाल्मिकी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष धरराजजी चावरीया यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून दिनांक १० जून पासून नगरपरिषदेसमोर संतोष थामेत यांनी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिलेला आहे. निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
भुसावळ नगरपरिषद मध्ये संबंधित अधिकाऱ्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. उपरोक्त विषयांन्वये या प्रकारे आमची व मागासवर्गीय दलित सफाई कर्मचाऱ्यांचे आपल्या हक्काच्या मागणी आहे.
१) २४/०२/ २०२३ च्या सुधारित शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक ८.१० सफाई कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरी नावावर करून मिळणणेबाबत
२) ०५/ ०९/२०२३ -च्या स्थायी निर्देश आकृतीबंधानुसार अहवाल सादर करून सफाई कर्मचाऱ्यांची ९५० पद भरती करून मिळणणेबाबत
३) भुसावळ नगरपरिषदेची स्थापना पासून सध्याच्या स्थितीत जे कर्मचारी आहेत तेच होते म्हणजे एकूण (३०२ कर्मचारी ) वाढत्या क्षेत्रफळ व लोकसंख्या वाढल्यामुळे कर्मचारी पद भरती करून मिळावे.
४) भुसावळ नगरपरिषद आस्थापना विभाग प्रमुख- वैभव एस पवार याला बेकायदेशीर नियुक्ती देऊन सफाई कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्यामुळे त्याला त्याची चौकशी करून निलंबित करणेबाबत.
५) भुसावळ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टीकीट, गणवेश व गम बूट व त्यांना लागणारे इतर साहित्य मिळणेबाबत.
६) भुसावळ नगरपालिकेतील सेवानिवृत्ती व स्वेच्छा निवृत्ती सफाई कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम व पेन्शन विक्रीची रक्कम तात्काळ मिळणेबाबत
७) भुसावळ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची व्यतिरिक्त त्यांना दुसरं काम दिलं जात असेल तर त्यांना २७ सप्टेंबर २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार एक व्यक्त केलेल्या कामाचा लाभ मिळणेबाबत.
८) संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करूनही संघटनेच्या कोणत्याही पत्राचे उत्तर दिलं जात नाही व त्यांना प्रतिसाद देत नाही व संघटनेच्या पत्रव्यवहाराला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.तरी संघटनेच्या मागण्यांना व तक्रारीला प्रतिसाद मिळणेबाबत.
९) दलित वस्ती वाल्मीक नगर वार्ड क्रमांक ९ मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणेबाबत.
१०) सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात भुसावळ नगरपरिषदेच्या मिटिंगमध्ये जे काही निर्णय घेत असतील तर संघटनेला त्यात सहभाग करून घेणे आवश्यक आहे. कारण की अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे ५०% टक्के हून अधिक सफाई कर्मचारी सदस्य आहेत. तसेच संघटनेला मान्यता मिळणेबाबत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!