शिवसेना सातारा जिल्हा तसेच कराड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मीनाक्षीताई यांचे अभिनंदन..

पोलीस वार्ता, पुणे | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई बबनराव पोळ यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे उंब्रज परिसरातील सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मीनाक्षीताई पोळ गेल्या 25 वर्षांपासून जनहिताच्या विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. महिला, पीडित, वंचित तसेच गरजू घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे, अन्यायग्रस्तांना मदतीचा हात देणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठविणे, हे त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.




































