Homeक्राईमशासकीय नोकरी प्रकरण ;  तिसरे संशयित आरोपी अटक !

शासकीय नोकरी प्रकरण ;  तिसरे संशयित आरोपी अटक !

भुसावळ – शहरातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने रुक्मिणी फाउंडेशन मार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून आथिर्क फसवणूक करणारे टोळी विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे तर दोन फरारी आहे.मेघराज सिंग नारायण सिंग पाटील असे नाव आहे.

याप्रकरणी वसंत जानबाजी ढोणे सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहणार मुरलीधर सोसायटी घर नंबर १६ जुना तोल नाका,टाटा मोटर्स,फेकरी यांचे मुलास नोकरीस लावून देण्याचे उद्देशाने पैसे घेवून फसवणूक केल्याने संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यांच्या विरुद्ध ता २१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील संशयितास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी खाकी दाखवितात संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने विजयकांता सुरेंद्र मुनोद ऊर्फे मेहता मॅडम राहणार पन्नाभवन, वरणगांव रोड गो गॅस पंपाचे शेजारी, शिवाजी नगर,योगेश केशव प्रसाद तिवारी राहणार रिंग रोड फालक नगर गणेश मंदिर जवळ भुसावळ, मुन्ना मोहन परदेसी राहणार फिल्टर हाऊस रोड कवाडे नगर भुसावळ, मेघराज सिंग नारायण सिंग पाटील राहणार साकरी तालुका भुसावळ अशांनी नावे सांगितली.

पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास ता.२१ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता ता.२५ पावेतो पोलीस कोठडी सुनावली होती.पोलिसांनी संशयित आरोपी अग्रवाल यास ता.२५ रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे. ता.२५ रोजी साडे आठ वाजेच्या सुमारास फरार संशयित आरोपी योगेश केशव प्रसाद तिवारी यास अटक करण्यात आली असून ता.२६ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.तसेच गुन्ह्यातील तिसरा फरारी संशयित आरोपी मेघराज सिंग नारायण सिंग पाटील यास ता.२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी फरारी यांचा पोलीस प्रधासन कसून शोध घेत आहे.गुन्ह्याचा अधिक तपास मंगेश बेंडकोळी सह योगेश महाजन,जीवन कापडे करीत आहे. आद्यपावतो २५,६८,४०६ रुपये रक्कम संशयित आरोपींकडून पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे.या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. जळगांव,नंदुरबार,बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली.                                                   कार्यालय मालक संशयाच्या भोवऱ्यात …..              शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून आथिर्क फसवणूक करणारे टोळी तील तीन संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. मात्र या टोळीचा मुख्य सुत्रधार संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने जिल्ह्याभरात रुक्मिणी फाउंडेशन मार्फत कार्यालये उघडून आर्थिक फसवणूक केली होती.या टोळीला कार्यालय उघडण्यासाठी ज्या ही मालकांनी जागा दिली असेल त्यात जागा मालकांची टक्केवारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलीस प्रशासनाने आर्थिक फसवणूक प्रकरणी जागा मालकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यास नक्की मोठे घबाड समोर आले शिवाय राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!