Homeआरोग्यनाशिक येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ जनसुनावणी! राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली...

नाशिक येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ जनसुनावणी! राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत!

शुक्रवार 30 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिलांसाठी जनसुनावणी..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पीडित, कौटुंबिक हिंसा सहन करणाऱ्या आणि समाजातील समस्याग्रस्त महिलांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवार 30 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिलांसाठी जनसुनावणी होणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारद्वारे ही माहिती दिली आहे.
या जनसुनावणीत तक्रारदार, पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तत्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जनसुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे मांडू शकेल. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलिस विभाग, समुपदेशन केंद्राच्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच पोलिस विभागाकडील महिला व मुलांकरीता असलेल्या साहाय्य कक्षाकडे प्राप्त असलेली प्रकरणे, महानगरपालिका व नगरपरिषद येथील समुपदेशन केंद्राकडील प्राप्त प्रकरणे या जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लबसमोर, नाशिक- पुणे महामार्ग, नाशिक येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 0253- 2236368 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!