बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास पठारे यांच्या मार्गर्शनाखाली झाला होता..

पोलीस वार्ता, ठाणे : आज 29 मार्च रोजी तेलंगणामध्ये झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंबई बंदर परिमंडळचे पोलीस उपआयुक्त डॉ.सुधाकर पठारे यांचे निधन झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, डॉ.सुधाकर पठारे हे आयपीएस प्रशिक्षण रिफ्रेशमेंट येथे प्रशिक्षणासाठी तेलंगणामध्ये गेले होते. ठाणे पोलीस दलात परिंमंडळ-4 मध्ये पठारे कार्यरत असताना बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास पठारे यांच्या मार्गर्शनाखाली झाला होता. सध्या ते मुंबईतील बंदर परिमंडळात उपायुक्त म्हणून कार्यरत होते.

ते नातेवाईक भगवत खोडके यांच्यासह श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गेले होते. बस आणि त्यांच्या गाडीत झालेल्या अपघात यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन दोघांचा झाला. डॉ.पठारे हे जानेवारी 2025 पासून मुंबईतील बंदर परिमंडळमध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होते. ते 2011 बॅचेचे आयपीएस अधिकारी होते.





































