Homeक्राईमसराफा दुकानातून ६२ हजारांच्या सोन्याच्या चमक्या लंपास

सराफा दुकानातून ६२ हजारांच्या सोन्याच्या चमक्या लंपास

पाच महिलांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल.

भोर प्रतिनिधी :- राम पाचकाळे.नसरापूर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील नसरापूर येथे एका सराफा दुकानातून सुमारे ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्या चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी अज्ञात पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय मिलिंद पंडीत (वय ३१, व्यवसाय – सोनार, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. दिनांक १३ मे २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नसरापूर येथील “पंडीत ज्वेलर्स” दुकानात पाच अनोळखी महिला व त्यांच्यासोबत एक लहान मुलगा आले होते. त्या वेळी दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होती.

फिर्यादी व त्यांची आई ग्राहकांना सोन्याच्या चमक्या दाखवत असताना, काही महिलांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच दरम्यान एका महिलेने काउंटरवरील दोन पाकिटे दुसऱ्या महिलेच्या हातात दिली. पुढे ती पाकिटे सोबत असलेल्या लहान मुलाकडे देण्यात आली. त्यानंतर संबंधित महिला कोणतीही खरेदी न करता दुकानातून निघून गेल्या.

यानंतर दुकानातील मालाची तपासणी केली असता, ३० हजार रुपये किमतीच्या ६० सोन्याच्या चमक्या तसेच ३२ हजार रुपये किमतीच्या २४ सोन्याच्या फॅन्सी चमक्या असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तळपे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!