महाराष्ट्र लोकसेवा(राज्यसेवा) आयोगामध्ये 2023, सहाय्यक कक्ष अधिकारी(Asst BDO) पदी नियुक्ती झाले..

पोलीस वार्ता, यवतमाळ (झरी) : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या कायर गावातील एका गरीब कुटुंबात जन्मलेले बुद्धिवान व्यक्तिमत्व म्हणजे बिंबिसार निखाडे, लहानपणापासून यांना अभ्यासाची गोडी होतीच पण अंगी जिज्ञासू वृत्ती जपत जीवनात काही तरी मोठे स्वप्न साकार करण्याची ओढ देखील होती, याच शिक्षणाच्या जोरावर आज त्यांनी उंच भरारी घेतली आहे. सध्या बिंबिसार निखाडे हे महाराष्ट्र लोकसेवा(राज्यसेवा) आयोगामध्ये 2023, सहाय्यक कक्ष अधिकारी(Asst BDO) पदी नियुक्ती झाले आहेत. त्यामुळे त्याचे गावकऱ्यांकडून मित्र परिवाराकडून कौतुक केले जात आहे.
बुद्धिवान बिंबिसार निखाडे यांची या आधी 2020 मध्ये पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच 2021 मध्ये परत पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक आणि सहा. कक्ष अधिकारी या पदी देखील निवड झाली होती. विशेष बाब म्हणजे 2020 च्या परीक्षेमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून राज्यात पहिला आणि राज्यकर निरीक्षक म्हणून राज्यात तिसरा येण्याचा अद्वितीय विक्रम ‘बुद्धिवान बिंबिसार निखाडे’ यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर केला आहे. सध्या ते सहाय्यक कक्ष अधिकारी (Asst BDO) म्हणून राज्याची आर्थिक राजधानी मुंबई येथे कार्यरत आहे. बुद्धिवान बिंबिसार निखाडे यांच्या यशाची शर्यत अशीच चालू राहो हीच त्यांच्या गाव तालुक्यातील समर्थकांची इच्छा आहे.






































