Homeक्राईमकारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भोर (राम पाचकाळे) तालुक्यातील कामथडी गावच्या हद्दीत खुटवड वस्ती परिसरात अनुप पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोडवर उभी असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर रविंद्र गायकवाड (वय २५, रा. करंदी ता. भोर) हे कापुरहोळ येथून मोटारसायकलवरून जात असताना त्यांना लघुशंकेसाठी कामथडी गावच्या हद्दीत थांबावे लागले. त्यावेळी अनुप पेट्रोलपंपासमोरील सर्व्हिस रोडवर उभी असलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार त्यांच्या निदर्शनास आली. गाडीमधून उग्र वास येत असल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता चालकाच्या सीटवर एक इसम बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.
सागर गायकवाड यांनी तत्काळ याबाबत राजगड पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संबंधित कार लॉक अवस्थेत असल्याने पोलिसांनी गाडीची काच फोडून दरवाजा उघडला. त्यावेळी आतमध्ये एक इसम मृत अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये आधार कार्ड, मोबाईल फोन तसेच एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड मिळून आले. तसेच गाडीचा क्रमांक एमएच ४६ सीएल ५९९२ असा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मृत व्यक्तीच्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून नातेवाईक धनाजी जगू पारेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी मृत व्यक्तीची ओळख विजय शिवाजी पारेकर (वय ३३, रा. राजदीपनगर हौसिंग सोसायटी, व्हिलेज रोड, भांडुप पश्चिम, मुंबई) अशी पटवून दिली.
यानंतर संबंधित व्यक्तीस सिद्धीविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी रात्री ९.५८ वाजता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि राठोड हे करत आहेत.
या घटनेची नोंद दाखल अंमलदार पोहवा गुंडगे यांनी केली असून प्रभारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!