अभिवादन कार्यक्रमात मान्यवरांनी दिवंगत बाबुराव रिपोर्टे यांच्या आठवणीना आपल्या मनोगतातून उजाळा दिला व श्रद्धांजली अर्पण केली..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिकरोड येथील देवळाली गावातील आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसेवक व लोकनेते दिवंगत बाबुराव भागाजी रिपोर्टे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन दि.25 मे 2026 रोजी करण्यात आले होते. हा कार्यक्रम मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्कारोड, गुलाबवाडी, देवळाली गाव या ठिकाणी संपन्न झाला.
तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर लोकनेते बाबुराव रिपोर्टे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बौद्धचार्यांनी त्रिशरण पंचशील गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक दिलीप अहिरे हे उपस्थित होते.
संघर्षमय जीवन आणि सामाजिक कार्यात जीवन वाहून देणाऱ्या लोकनेते बाबुराव भागाजी रिपोर्टे यांचा जन्म 17 जुलै 1931 साली झाला. त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह, 1956 साली इंडियन सेक्युरिटी प्रेस संप, भूमिहिनांचा सत्याग्रह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमज्योत यात सक्रिय सहभाग देऊन सलग 15 वर्ष नगरसेवक पद देखील भूषविले होते. रस्ते-पाणी स्वच्छतेसाठी मोर्चे, आंदोलने करणे, शांतता समिती सदस्य, नाशिकरोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सुरू करणे, नामांतर लढा, मालधक्का देवळाली गाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात मोलाचा वाटा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते राज्यपाल दिवंगत रा.सु.गवई यांच्या रिपब्लिकन पक्षात जिल्हाध्यक्ष म्हणून काम सांभाळले. गवई यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची आंबेडकर चळवळीत ओळख होती. त्यांचे 72 व्या वर्षी 25 मे 2003 रोजी निधन झाले.
यावेळी स्मृतिदिनी अनेक मान्यवरांनी दिवंगत बाबुराव रिपोर्टे यांच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला व श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमासाठी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, उपाध्यक्ष भारत निकम, नेते चंद्रकांत भालेराव, शहराध्यक्ष समीर शेख, उद्योजक शिवनारायण सोमानी, गुल्लू शेठ आनंद, पत्रकार रवींद्र जाधव, पत्रकार भास्कर साळवे, उघोजक निर्मल भंडारी, नगरसेवक जयंत जाचक, बौद्धाचार्य चावदास भालेराव, कुणाल कांबळे, भाईजान बाटलीवाला, दिनेश निकाळे, कामिल इनामदार, , रतन खडताळे, प्रवीण पगारे, सुधाकर चंद्रमोरे, विश्वनाथ भालेराव, प्रमोद सोनकांबळे, आकाश भालेराव, शशिकांत वाघचौरे, किशोर खडताळे, पेत्रस बत्तीशे, विनोद सोनकांबळे, नितु सोनकांबळे, रवी मोकळ, राजू मोकळ, कैलास वानखेडे, जयपाल धिवरे, दीपक वाघ, लालचंद शिरसाट आदी उपस्थित होते.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...