Homeउद्योगसातपूर येथील कंपनीतील कॉपर पार्टची चोरी करणारे 5 आरोपी टोळीसह शहर गुन्हेशाखा...

सातपूर येथील कंपनीतील कॉपर पार्टची चोरी करणारे 5 आरोपी टोळीसह शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून जेरबंद

26 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3.50 ते 4.28 वाजेच्या दरम्यान एरियन फिनीसिंग्स प्रा.लिमीटेड कंपनी, प्लॉट नं. डी/8, सातपुर, MIDC नाशिक, या कंपनीमधून कॉपर पार्टची चोरी झाली होती..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर घडणाऱ्या घरफोड्या व चोरीच्या घटना आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस प्रशासनाला दिले आहे.
त्याच अनुषंगाने चोरीच्या घटनेचा सातपुर पोलीस ठाण्यात गुरनं 122/2025 भा.न्या.सं.क 305(अ), 331(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी गणेश शिवाजी सुर्यवंशी रा. पिंपळगांव खांब, नाशिक यांनी तक्रार दिली होती की, दि.26 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3.50 ते 4.28 वाजेच्या दरम्यान त्यांच्या एरियन फिनीसिंग्स प्रा. लिमीटेड कंपनी, प्लॉट नं. डी/8, सातपुर, MIDC नाशिक, या कंपनीमधून कॉपर पार्टची चोरी झाली आहे. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हेशाखा युनिट-2 च्या पथकाचे पोह. सुनिल आहेर व पोअं. तेजस मते यांनी तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे खात्रीलायक माहीती मिळवली की,
सातपूर येथील एरियन फिनी सिंग्स प्रा.लिमीटेड या कंपनीत दि.26 एप्रिल 2025 रोजी पहाटे झालेली चोरी ही संशयित रोहित गवई, विवेक बत्तीसे आणि त्याच्या साथीदारांनी केली असून रोहित गवईने चोरीसाठी वापरलेली त्याचेकडील मोपेड दुचाकी आणि चोरीत सोबतचा साथीदार विवेक बत्तीसे हे बेथेल नगर, शरणपुर, नाशिक या ठिकाणी एका पत्र्याच्या कंपाऊंड जवळ येणार आहे. मिळाली सदरची माहिती नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि. हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने श्रेणी पोउपनि. मुक्तारखान पठाण, पोह. अतुल पाटील, पोअं. तेजस मते, संजय पोटीदे, प्रविण वानखेडे, वापोअं. जितेंद्र वजीरे यांचे पथक तयार करून बेथेल नगर शरणपुर रोड येथे जावून खात्री केली असता संशयित 1)रोहित सुरेश गवई (वय 19) रा. शरणपुर रोड, बिझिनेस स्वेअरचे बाजुला, नाशिक 2)विवेक सतिश बत्तीसे (वय 19) रा. जुने सी.पी ऑफिसचे समोर, शरणपुर रोड, नाशिक हे तेथे मिळून आले. त्यांची चौकशी केली असता सदरची चोरी ही त्यांनी व साथीदार 3)लकी भंडारे, 4)प्रेम भगत, 5)आसाराम धुताडे अशी सर्वांनी मिळून केली असून चोरी केलेले कॉपरचे पार्ट विक्रीसाठी साथीदार 6)अजय मैंदकर याच्या ओळखीच्या रिक्षा एमएच 15 एफयू 4035 याद्वारे रफीक स्क्रॅप सेंटर, दिंडोरी नाका, पंचवटी येथील भंगार व्यवसायिक अझहर अत्तार यास व जे.पी.स्क्रॅप सेंटर, मदिना चौक, नाशिक येथील भंगार व्यावसायीक गुलामखान नबाबखान पठाण यांस विक्री केल्या असल्याची कबुली दिली.
त्यानुसार पंचनामा करून रोहित सुरेश गवई व विवेक सतिश बत्तीसे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ज्युपिटर मोपेड दुचाकी आणि भंगार व्यावसायीक 7)अइहर कय्युम अत्तार, (वय-30) रा. घर नं.2708 मुलतानपुरा, भद्रकाली, नाशिक तसेच सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील पोह. अनिल आहेर, पोअं. रविंद्र जाधव, सचिन आजबे यांना सोबत घेवून भंगार व्यावसायीक 8)गुलामखान नबाबखान पठाण (वय-52) रा.घर नं.2887, जहाँगीर मशिद वाळ, चौक मंडई, भद्रकाली, नाशिक यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरी करून विकलेला कॉपर पार्ट असा एकुण 2,21,150/- रू. किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, परमेश्वर दराडे यांनी रिक्षा एमएच 15 एफ.यु 4035 हीचा शोध घेवून सदर गुन्ह्यात सहभागी असल्याने रिक्षा चालक अजय विश्वनाथ मैंदकर, (वय-27) रा. विशाल मळा, बेथेल नगर, सिध्दीविनायक टॉवर जवळ, शरणपुर, नाशिक यास देखील ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2,00,000/- रू किंमतीची रिक्षा पंचनामा करून जप्त केली आहे. अशाप्रकारे संपूर्ण गुन्ह्यात 5 आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून 4,21,150/- रूपयांचा मुद्देमाला जप्त करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून सातपुर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं- 122/2025 हा गुन्हा उघडकिस आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना सातपुर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि. डॉ.समाधान हिरे, मसपोउनि. भारती देवकर, सपोउनि. विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, सुनिल खैरनार यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!