मंगरुळ येथील रहिवासी गोपाल मधुकर ठाकरे या शेतकरी पुत्राची आत्महत्या आणि वनोजादेवी गावात रंगनाथ बापूजी बरडे यांचा मृतदेह नाल्यात सापडला!
पोलीस वार्ता, यवतमाळ | वणी तालुक्यात शनिवारी दोन वाईट घटना घडल्या, तालुक्यातील मारेगाव, मंगरुळ गावातील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली, तर दुसरी घटना म्हणजे वनोजादेवी येथे एका व्यक्तीचा मृतदेह नाल्याच्या काठावर आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांनी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेला माहितीवरून सविस्तर वृत्त असे की, मारेगाव, मंगरुळ येथील रहिवासी गोपाल मधुकर ठाकरे, वय वर्ष 36 या शेतकरी पुत्राने शनिवार, दि.21 डिसेंबर 2024 रोजी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे गोपालने आत्महत्येपूर्वी राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील त्याच्या भावजाला फोन करून “उद्या माझ्या मयतीला या” असे सांगितले. परंतु भावजाने हे शब्द गंभीरतेने घेतले नाहीत, रात्री पुन्हा फोन केल्यावर गोपालचा फोन लागल्याने त्याच्या घरच्यांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी तीनच्या सुमारास गोपालचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत आढळून आला. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना कळवले. मारेगाव पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
परिस्थिती गोपालच्या वडिलांच्या नावाने तीन एकर शेती आहे. गोपाल आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असे आणि त्याशिवाय गवंडी काम करून घरखर्च चालवत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक लहान, मुलगी आणि चार विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.
गोपालच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अजून समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय किसन संकुरवार करत आहेत.
तसेच दुसऱ्या घटनेत, वनोजादेवी येथे एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. वनोजादेवी गावात रंगनाथ बापूजी बरडे (वय 64) यांचा मृतदेह गावाशेजारील स्मशानभूमी जवळ नाल्याच्या काठावर आढळून आला. त्यांच्या तोंडावर फेस असल्याने मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास पोलीस करत आहेत. रंगनाथ बरडे यांच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम साठी हलवला असून तपास चालू आहे.
वणी तालुक्यात गोपाल ठाकरेच्या आत्महत्येने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे, तर रंगनाथ बरडे यांच्या संशयास्पद मृत्यूने गावात घबराट निर्माण झाली आहे. पुढील तपासातून या घटनांचे सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.
संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन..
पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...
महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण
बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण
दिनांक 18.04.2026...
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त”
बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट):
महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ
प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद
बुरहानपुर/18 अप्रैल,...