Homeआरोग्यनाशिकरोड मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यावर शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून...

नाशिकरोड मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यावर शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून छापा

घरगुती भारत गॅस कंपनीचे 63 सिलेंडर, 3 वजन काटे व 3 मशीन असा एकूण 2,11,700/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील बेकायदेशिर अवैध धंद्यांवर तसेच जुगार अड्डड्यांवर कारवाई आणि चोरीच्या घटना, वाढती गुन्हेगारी यावर कारवाई करण्याबाबत सुचना नाशिक शहर आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांनी दिले आहेत.
त्यानुसार शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे पोलीस पथक दि.3 मे 2025 रोजी हद्दीत गस्त घालत असताना, पथकाचे सपोउपनि. विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमी मिळाली की, नाशिकरोड भागातील पाटील गॅरेजच्या मागीलबाजू भारती मठाजवळ एका पत्राचे शेडमध्ये विनापरवाना, बेकायदेशिररित्या घरगुती गॅस सिलेंडर मधुन मशिनद्वारे ज्वलनशिल स्फोटक गॅस पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेवून भरून दिला जात आहे. मिळालेली सदर माहिती गुन्हेशाखा युनिट-2 चे सहा.पोनि. हेमंत तोडकर यांना देण्यात आली.

खात्री करून पुढील कारवाईसाठी श्रेणी पोउपनि. यशवंत बेंडकोळी, सपोउपनि. विलास गांगुर्डे, पोह. संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, पोअं. सुनिल खैरनार यांचे पोलीस पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला असता कारवाईत मिळून आलेले आरोपी,
1)शिवा दिनेश लोणारे (वय-20) रा. राजवाडा, मालधक्का रोड, नाशिकरोड,
2)शाकीर मोहम्मद शहा (वय-25) रा. सुंदरनगर झोपडप‌ट्टी, गल्ली नं-2, देवळालीगाव, नाशिकरोड,
3)नवाझ अहमद शहा (वय-21) रा. सुंदरनगर झोपडपट्टी, गल्ली नं-2, देवळालीगाव, नाशिकरोड.

हे आरोपी भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विनापरवाना, बेकायदेशिररित्या गॅस सिलेंडर मधुन मशिनद्वारे ज्वलनशिल(स्फोटक) गॅस पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेवून भरून देत होते. स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशिररित्या ते हा व्यवसाय करत आल्याले आढळून आले. त्यांच्याकडून मोठे व छोटे असे 63 गॅस सिलेंडर टाक्या, 3 मोटार(मशीन) व 3 वजन काटे आणि रोख रक्कम असे सर्व मिळून एकुण 2,11,700/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोह. प्रकाश बोडके यांनी सरकारच्या वतीने तिन्ही आरोपींविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भा.न्या.सं.क- 287 व 1955 च्या जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात प्रकाश महाजन, प्रविण वानखेडे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!