Homeक्राईमभुसावळ तालुक्यात अवैध दारू वाहतूक उघड ; अँक्टिव्हासह आरोपी जेरबंद

भुसावळ तालुक्यात अवैध दारू वाहतूक उघड ; अँक्टिव्हासह आरोपी जेरबंद

(गुप्त माहितीच्या आधारे साकरी जवळ पोलीसांची कारवाई; ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त)

भुसावळ – तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे. ता.१८ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार योगेश बाबुराव माळी (वय ३५, रा. सिध्देश्वर नगर, वरणगाव) हा अॅक्टिव्हा(एम.एच.१९ डी.डी.६९१२) वरून भुसावळहून साकरीकडे अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने साकरी गावाजवळ सापळा रचला.

सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली. तपासणीत अॅक्टिव्हावर बॉक्समध्ये दारू साठवलेली आढळून आली.आरोपीकडे दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ७९ हजार १९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संकेत झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी योगेश माळी याला अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाईत पोलीस कर्मचारी रमन सुरळकर, योगेश पालवे, अविनाश टहाकळे व किरण तायडे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!