मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहण्यात आली..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने कै.रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे दि.26 जुलै 2025 रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लेफ्टनंट कर्नल उबाळे, कारगिल युद्धात शहीद झालेले शिपाई एकनाथ खैरनार यांच्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्यासह जिल्ह्यातील इतर शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, युद्धात सहभागी झालेले सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रसिद्धी पत्रकारद्वारे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी यांची माहिती दिली.






































