Homeक्राईमभुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव रोडवरील हिरो शोरूमच्या मागील भागात दोन इसम गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे व त्यांच्या पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचला.

शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजेच्या सुमारास हिरो शोरूमच्या मागील अंधाऱ्या भागात एका इलेक्ट्रिक दुचाकीवर दोन संशयित इसम उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीत आरोपी विशाल दादा सुरवाडे आणि शुभम बबन वैद्य (दोघेही रा. भुसावळ) यांच्या ताब्यातून १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राउंड तसेच ३०० रुपये किमतीचा स्टेनलेस स्टीलचा टोकदार चाकू जप्त करण्यात आला.

या शस्त्रांसाठी कोणताही वैध परवाना अथवा पास आरोपींकडे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार वारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई, राहुल बेहेनवाल, दीपक शेवरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल वानखेडे यांनी कारवाईत उल्लेखनीय भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.. पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...

इच्छापुर में कुछ ग्रामीणों का स्वास्थ्य बिगडा

0
बुरहानपुर जिले के इच्छापुर ग्राम में हर घर में दो-दो तीन-तीन पेशेंट पेट मरोडकर आना ,बार बार लैट्रिन के लिए जाना एवं उल्टी दस्त...

बुरहानपुर: केला किसानों की समस्याओं को लेकर किसान कांग्रेस का प्रदर्शन,सरकार पर लगाए गंभीर...

0
बुरहानपुर। (रमाकांत मोरे) मध्य प्रदेश एवं बुरहानपुर जिले के केला किसानों की विभिन्न मांगों को लेकर जिला किसान कांग्रेस कमेटी ने सरकार के खिलाफ...

धार भोजशाला में मां सरस्वती वाग्देवी दर्शन यात्रा एवं सामूहिक हनुमान चालीसा का आयोजन

0
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

0
भुसावळ - येथील लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध कारवाई करत सुमारे २१ हजार ११५ रुपयांचा गुटखा...

error: Content is protected !!