Homeआरोग्यमहिलांचे सार्वजनिक शौचालय तोडल्या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करा.

महिलांचे सार्वजनिक शौचालय तोडल्या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करा.

भुसावळ – तालुक्यातील कंडारी गावातील वार्ड क्रमांक २ मध्ये सामाजिक सभागृह,अंगणवाडी, शिवगुफा येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याकारणाने महिला  शौचालयामध्ये जात नव्हत्या याचा फायदा इंजिनियर हमास खान, उपविभागीय अभियंता व संबंधित अधिकारी यांनी घेत महिलांचे सार्वजनिक शौचालय जे.सी.बी. मशीनव्दारे तोडले.या प्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य कंडारी सुरेखा सरजू तायडे यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाला दिनांक २३/१२/२०२५ रोजी तक्रार दिली होती.मात्र उपविभागीय अभियंता चंद्रशेखर तायडे यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले.जिल्ह्यापरिषदेच्या माध्यमातून कंडारी गावातील वार्ड क्रमांक २ मध्ये पाच युनिटचे १० लाख रुपये किंमतीचे महिलांचे सार्वजनिक शौचालय सन. २०१८-१९ मध्ये बांधण्यात आले होते.संरक्षण भिंतीच्या कामास अडचण येत असल्याने इंजिनियर हमास खान,उपविभागीय अभियंता व संबंधित अधिकारी यांच्याशी संगनमत करीत जे.सी. बी मशीनेने महिलांचे सार्वजनिक शौचालय तोडल्याने महिलांची गैर सोय होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य कंडारी सुरेखा सरजू तायडे यांनी दिनांक २/१/२०२६ रोजी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय भुसावळ यांना २६ जानेवारी २०२६ रोजी आमरण उपोषण बसणे बाबत अर्ज दिला होता. यानंतरही उपविभागीय अभियंता चंद्रशेखर तायडे यांनी महिलांचे सार्वजनिक शौचालय तोडले प्रकरण हलक्यात घेत आपल्या कामात मग्न राहिले.तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जाची उपविभागीय अभियंता चंद्रशेखर. डी.तायडे यांच्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने अखेर सुरेखा तायडे यांनी दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी आमरण उपोषण सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय भुसावळ आवारात सकाळी सात वाजेला केले.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय भुसावळ येथे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर उपविभागीय अभियंता यांनी उपोषण कर्त्यांनी भेट घेतली.या प्रकरणी आमदार साहेबांशी बोलणे झाले आहे.तुम्ही शौचालय बांधण्याबाबत नवीन ठराव दया.एप्रिल महिन्यात नवीन शौचालय बांधून देण्यात येईल असे उपविभागीय अभियंता चंद्रशेखर तायडे यांनी उपोषण कर्त्यांनी मौखिक आश्वासन दिले.
उपविभागीय अभियंता यांनी मागणी मान्य केल्या. त्यानंतर उपोषण कर्त्यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!