Homeक्राईमभुसावळात मध्यरात्री अवैध वाळूचा डंपर जप्त

भुसावळात मध्यरात्री अवैध वाळूचा डंपर जप्त

भुसावळ, – शहरात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत सुमारे ५ लाख १२ हजार रुपयांचा डंपर व वाळूचा साठा ता.१७ रोजी रात्री पावणे बारा जप्त केला.या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना नाहाटा चौकातून जामनेर रोडवरील हॉटेल प्रिमीअर प्राईड परिसरातून एक पिवळ्या रंगाचा डंपर (क्र.जी.जे. ०३ ए.एक्स ९१३०) अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने शुक्रवारी (ता. १७) रात्री सापळा रचला.

रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास संशयित डंपर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबविले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव कुंदन मंगल कोळी (वय २०, रा. पंचमुखी हनुमान नगर, साकेगाव, ता. भुसावळ) असे सांगितले. डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे तीन ब्रास गौण खनिज वाळू आढळून आली.

वाळू वाहतुकीसंदर्भातील शासकीय पास किंवा परवाना मागितला असता चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अंदाजे ५ लाख रुपयांचा अशोक लेलँड कंपनीचा डंपर व सुमारे १२ हजार रुपयांची वाळू, असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत झांबरे, विजय नेरकर, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी, दिलीप कोल्हे तसेच एएसआय सुनील सोनवणे यांनी सहभाग घेतला. पंचांसमक्ष पंचनामा करून डंपर व चालकाला ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत अरुण झांबरे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात कुंदन मंगल कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

error: Content is protected !!