Homeक्राईमराजगड पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा; दोन आरोपी ताब्यात इतर दोघांचा शोध सुरू..

राजगड पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा; दोन आरोपी ताब्यात इतर दोघांचा शोध सुरू..

मयत संजय देशमुख यांचा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने डोके, तोंड व हातावर वार करून निर्घृण खून केला होता..

पोलीस वार्ता, भोर | पुणेच्या मौ. शिंदेवाडी हद्दीतील जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खून प्रकरणाचा राजगड पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात उलगडा केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
मिळालेली माहिती अशी की, शिंदेवाडी जवळील जुन्या कात्रज बोगद्यापुढे हॉटेल आमराईजवळ रस्त्याच्या कडेला दि. 11 जुलै 2026 रोजी रात्री मयत संजय बाबूराव कडू देशमुख, वय-40 वर्ष यांचा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने डोके, तोंड व हातावर वार करून निर्घृण खून केला होता. या घटनेनंतर फिर्यादी गौरव चंद्रकांत झेंडे यांच्या सांगण्यावरून राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं.- 264/2026 भा.न्या.संहिता कलम 103(1) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 व 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहा. पोनि. चेतन मछले यांनी तपासाला गती देऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे दि.14 जुलै रोजी संशयित आरोपी 1)मंथन दिनेश वैद्य (वय-25 वर्ष) आणि 2)सौरभ सागर परदेशी (वय-24 वर्षे) या दोघांना अटक केली. तसेच तपासात 3)मिझान सुदीन शेख (वय-32 वर्षे) व 4)संदीप बाबुलाल कोरी यांचा देखील गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यांचा देखील शोध सुरू आहे. लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल अशी माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पो.अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पो.अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पो. अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोनि.संतोष जाधव, पोनि. प्रमोद क्षीरसागर स्थानिक गुन्हे शाखा, सहा.पोनि चेतन मछले, पोउपनि. युवराज धोंडे तसेच राजगड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून केली आहे. यामुळे राजगडमधील नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!