Homeआरोग्यवणी येथील शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया येत्या सोमवारपासून सहा जिनिंगवर सुरू होणार...

वणी येथील शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया येत्या सोमवारपासून सहा जिनिंगवर सुरू होणार आहे..

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सीसीआय (CCI) यांच्या वतीने युद्धपातळीवर तयारी केली जात आहे, अशी माहिती समितीचे सचिव हेमंत कुमार ठाकरे यांनी दिली.

कापूस खरेदी प्रक्रिया येत्या सोमवारपासून सहा जीनिंगवर सुरू होणार आहे.
पोलीस वार्ता, वणी | वणी येथील शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया येत्या सोमवारपासून सहा जीनिंगवर सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन/अत्यावध प्रणालीचे नोंदणी कार्यही त्याच ठिकाणी केले जाईल. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सीसीआय (CCI) यांच्या वतीने युद्धपातळीवर तयारी केली जात आहे, अशी माहिती समितीचे सचिव हेमंत कुमार ठाकरे यांनी दिली.
वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांच्या दणक्या नंतर यंत्रणा कार्यान्वित होण्यास सुरवात झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सीसीआय यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत कापूस खरेदीसाठी अत्यावध प्रणालीला सुलभ करण्याच्या दृष्टीने टोकण बंद करून सरळ कापूस खरेदी करून तिथेच त्यांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला गेला होता.
वणी येथील कापूस खरेदी सुरुवातीला केवळ 3 जीनिंगमध्ये सुरू होती, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 2 संगणकावर ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था होती. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी टोकण दिले जात होते, परंतु टोकण घेऊनही त्यांची नोंदणी प्रलंबित पडत होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या त्रासाला लक्षात घेत, आमदार संजय देरकर यांनी टोकण पद्धत बंद करण्याची शिफारस केली आणि सीसीआयसोबत करार केलेल्या सर्व जीनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी यंत्रणा तयार करण्याचे आदेश दिले. या सूचनेनुसार, 28 नोव्हेंबर रोजी बाजार समितीमध्ये ऑनलाईन नोंदणीसाठी दोन अतिरिक्त सेंटर सुरू करण्यात आले, ज्यामुळे आता एकूण 4 सेंटरवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सोयीचे आणि जलद सेवा मिळेल.
वणी येथील कापूस खरेदीसाठी सीसीआयने एस.बी.महाविरा, साईकृपा, राजा, गुलाब, नगरवाला अशा 6 जीनिंग धारकांशी करार केला आहे. सुरुवातीला आळीपाळीने 3 जीनिंग केंद्रांवर कापूस खरेदी सुरू होती, परंतु सोमवारपासून 6 जीनिंग केंद्रांवर कापूस खरेदी सुरू होणार आहे. दररोज 400 ते 500 वाहने कापूस खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी सीसीआय आणि कृषी उत्पन्न बाजार समिती युद्ध पातळीवर तयारी करत आहेत.
तथापि, ऑनलाईन नोंदणी पद्धत अनिवार्य आहे. आज रोजी 129 वाहने सीसीआयने खरेदी केली असून, 5 वाहने यार्डात थांबली होती, त्यांना देखील लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती सीसीआय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. झाडे यांनी दिली.
  • टोकन बंद पण ऑनलाईन नोंदणी अनिवार्य!
सीसीआयकडून वणी येथील कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रणालीला चालना देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना टोकण देण्यात येत होते. यामुळे दररोज केवळ 50 वाहने कापूस खरेदी होऊ शकत होती. पण आता टोकण पद्धत बंद करून, सरळ खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस भरलेली वाहने काटा करून ऑनलाईन नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर पावती दिली जाईल. कापसाचा चुकारा जमा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, लिंक असलेले बँक खाते पुस्तक, सातबारा उतारा आणि 2024-25 चा पेरावे पत्रक आवश्यक आहेत. याशिवाय, जे शेतकऱ्यांचे नाव सातबाऱ्यावर आहे, त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत रक्त नाते असलेल्या व्यक्तीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • शेतकऱ्यांनी अफवांना महत्त्व देऊ नये..
शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम हे लक्षात घेत, काही लोकांच्या वतीने अफवा पसरवण्यात येत आहे की ऑनलाईन पद्धत बंद केली आहे. हे चुकीचे आहे. खरी गोष्ट अशी की, फक्त ऑनलाईन नोंदणीसाठी लागणारे टोकण बंद करण्यात आले आहे, परंतु ऑनलाईन पद्धतीत कोणताही बदल केलेला नाही.
विरोधी घटकांकडून शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, अशा अफवांना महत्त्व देऊ नये आणि त्यांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांची योग्य माहिती घेत राहावीत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या भ्रमात पडून दिशाभूल होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!