Homeमहत्त्वाचेभुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा...

भुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

भुसावळ – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी ‘लोक अदालतीचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये भुसावळ शहर, बाजार पेठ, तालुका आणि नशिराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कलमान्वये दाखल असलेले एकूण १०७ खटले सामोपचाराने निकाली काढण्यात आले असून, एकूण ७७,३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस ठाणेनिहाय निकाली काढलेली प्रकरणे:
लोक अदालतीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चारही पोलीस स्टेशनने सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:
नशिराबाद पोलीस स्टेशन: एकूण ३५ केसेस निकाली काढण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित कलमांचा समावेश होता. यातून २६,००० रुपयांचा दंड वसूल झाला.
भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन:
एकूण ३१ केसेस निकाली काढण्यात आल्या. यामध्ये दारूबंदी आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबतच्या खटल्यांचा समावेश होता. एकूण २७,५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
भुसावळ शहर पोलीस ठाणे: एकूण २४ खटल्यांचा निपटारा करण्यात आला, ज्यामध्ये प्रामुख्याने रस्ते अडथळा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केसेस होत्या. एकूण १२,१०० रुपयांचा दंड वसूल झाला.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन:
एकूण १७ केसेस निकाली काढण्यात आल्या असून ११,७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
निकाली काढण्यात आलेल्या केसेसचे प्रकार:
या लोक अदालतीमध्ये प्रामुख्याने खालील प्रकारच्या प्रकरणांवर सुनावणी होऊन निकाल देण्यात आला:
१. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५: सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणे वागणे किंवा अडथळा निर्माण करणे.
२. मोटार वाहन कायदा (MV Act) कलम १८५:मद्यप्राशन करून वाहन चालवणे (Drunk and Drive).
३. कोपटा (COTPA) कायदा: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबतचे गुन्हे.
४. महाराष्ट्र पोलीस कायदा (BP Act): कलम १०२, १०५, ११७ आणि ३३(१)(W) नुसार परवाना व नियमांचे उल्लंघन करणे.
५. दारूबंदी कायदा (Prohibition Act): अवैध दारू वाहतूक किंवा सेवन संदर्भातील प्रकरणे.
तक्रार निवारण दिनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद:
लोक अदालतीसोबतच आज उपविभागात ‘तक्रार निवारण दिन’ देखील पाळण्यात आला. यामध्ये नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण १३२ तक्रार अर्जांपैकी ५८ अर्जांचा जागेवरच निकाल लावून ते निर्गत करण्यात आले. प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेमुळे न्यायालयांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाली असून, नागरिकांनीही सामोपचाराने वादावर पडदा टाकण्याला पसंती दर्शविली आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल वरिष्ठांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!