Homeउद्योगरावेर शहरात पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल...

रावेर शहरात पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी..

शेखर पाटील उर्फ भोला याने पत्रकार राकेश सुतार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली आहे..

पोलीस वार्ता, रावेर : पाचोरा शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत (सट्टा, पत्ता, ऑनलाईन चक्री) पाचोरा येथील पत्रकार श्री राकेश सुभाष सुतार आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या होत्या या बातम्यांमुळे अवैध व्यवसाय चालवणारा शेखर पाटील उर्फ भोला (रा. कृष्णापुरी) याने पत्रकार राकेश सुतार यांना सार्वजनिक ठिकाणी जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली आहे. त्यामळे या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार, या प्रकरणी शेखर पाटील उर्फ भोला यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचीही चौकशी करावी. मागील सात ते आठ दिवसाचे शेखर पाटील उर्फ भोला यांचे फोन कॉल रेकॉर्ड (CDR) काढून तपास करावा, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई कराल, अश्या आशयाचे निवेदन रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने मा.तहसीलदार आणि पो.निरीक्षक रावेर यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी (शिवाभाई), म.राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विजय अवसरमल, कार्याध्यक्ष विनायक जहुरे,जळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार, रावेर शहर अध्यक्ष शेख हमीद शेख रफीक, रावेर शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत वैदकर, विजय काशीनाथ अवसरमल, प्रविण पाटील, श्रीराम गंवळी, रहुफ खाटीक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्याचबरोबर निवेदनाचे प्रति राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, ग्रह सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक तहसीलदार रावेर यांना पाठविण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता टीम : जळगाव..
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

error: Content is protected !!