म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल होऊन मागील सहा महिन्यापासून फरार आरोपींना गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील म्हसरूळ रोडवरील गजानन पेट्रोल पंपाजवळ, देवभुमी अपार्टमेंट समोर, म्हसरूळ येथे सहा महिन्यापूर्वी दि.8 सप्टेंबर 2024 रोजी प्रविण रावसाहेब शिंदे व सोबत गणपती मंडळाचे सदस्य कार्यक्रम करत असताना त्याठिकाणी सकाळी 9.50 वाजेच्या सुमारास कुणाल एखंडे,अभिमान सानप, करण(गणेश) कर्पे, महेश कर्पे, सिध्देश्वर पिंगळे, शुभंम मोहिते यांनी त्यांच्या जवळ असलेल्या धारदार कोयत्याच्या मागील बा, जूचा उपयोग करत प्रविण शिंदे यास हातावर, पाठीवर, मांडीवर, पायावर जबर करून जखमी केले. तसेच घटनास्थळी उपस्थित नागरिकांना व मंदिर सदस्यांना शिवीगाळ करत धमकावले व परीसरात दहशत निर्माण केली. अशी फिर्याद शिंदे यांनी आरोपींविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाणे येथे दि.9 सप्टेंबर 2024 रोजी दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींचा वरिष्ठांच्या आदेशाने शोध घेत असताना पोह. प्रशांत मरकड व पोना. विशाल देवरे यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, आरोपी करण उर्फ गणेश कर्पे व सिध्देश्वर पिंगळे हे बिझनेस एन्डेक्स बिल्डींग मखमलाबादरोड भागात फिरत आहेत. सदरची माहीती वयोनि श्री.मधुकर कड सर यांना देवुन त्यांनी गुन्हेशाखा युनिट-1 चे पोउनि रविंद्र बागुल, पोह. प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, पोना. विशाल देवरे, पोअं जगेश्वर बोरसे, पोअं समाधान पवार यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-1 चे पथक दि.25 मार्च 2025 रोजी संबंधित मखमलाबाद रोडवरील परिसरात शोध घेत असताना जॉकी शो-रूम समोर आरोपी दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे विचारताच त्यांनी 1)गणेश उर्फ करण दिलीप कर्पे, (वय-32) रा.रामकृष्ण नगर, शांतीनगर, मखमलाबादरोड 2)सिध्देश्वर संतोष पिंगळे, (वय-32) रा.रामकृष्णनगर, शांतीनगर, मखमलाबादरोड असे सांगितले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची विचारणा केली असता, त्यांनी कबुली दिली. यांच्यावर गु.र.नं. 233/2024 भा.न्या. सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 189 (4), 191(2), 191(3), 190 सह भा.ह.का. कलम 4/25 सह म.पो.का.कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मा.श्री. संदिप कर्णिक साहेब, पो.उपआयुक्त गुन्हे मा.श्री. प्रशांत बच्छाव, सहा. पो.आ.गु.शा. मा.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. या पथकात पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे, सुक्राम पवार यांचा देखील समावेश आहे.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा
भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...