Homeराजकीयभुसावळ पालिका निवडणूक निकाल

भुसावळ पालिका निवडणूक निकाल

भुसावळ (21 डिसेंबर 2025) भुसावळ पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा रविवारी सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आतापर्यंत भाजपाच्या उमेदवार रजनी सावकारे आघाडीवर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत रजनी सावकारे यांना तीन हजार 775 तर प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या गायत्री चेतन भंगाळे यांना तीन हजार 252 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या अन्सारी अर्शिया यांना 920 तर काँग्रेसच्या सविता सुरवाडे यांना 826 मते मिळाली असून 158 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक एक ‘अ’ मधून पूजा प्रेमचंद तायडे (1349) मतांनी विजयी झाल्या आहेत तर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती लक्ष्मण सोयंके (565), अपक्ष सीमा रुपेश धांडे (1180) पराभूत झाल्या तर 82 मतदारांना नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग एक ‘ब’ मधून भाजपाचे गिरीश सुरेश महाजन (1462) मतांनी विजयी झाले. त्यांने शिवसेना शिंदे गटाचे अमोल मनोहर इंगळे (880), अपक्ष गिरीश पंडित पाटील (707), निलेश केशव महाजन (62) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी व भाजपा उमेदवाराचा विजय
प्रभाग दोन ‘अ’ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उल्हास भीमराव पगारे (1548) मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपा उमेदवार सविता रमेश मकासरे (1512), काँग्रेसच्या शुभांगी आनंद सोनवणे (331) मतांनी पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग दोन ‘ब’ मधून भाजपाच्या प्राची उदय पाटील (1295) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी पवार गटाच्या रत्नाबाई शांताराम जाधव (1039), अपक्ष उमेदवार ऐन्जिला रितेश नायके (50), अर्चना गणेश सपकाळे (915), मंगला विजय साळवे (99) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 58 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक तीन ‘अ’ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताराम दत्तू सुरवाडे (1657) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी पवार गटाच्या आशा विशाल सपकाळे (672), वंचित आघाडीचे रुपेश रमेश गायकवाड (221), कविता सुनील ढिवरे (257), किर्ती सुरेश वानखेडे (80) यांचा पराभव केला. 20 मतदांनी नोटाचा वापर केला.

प्रभाग तीन ‘ब’ मधून काँग्रेसच्या काजल नरेंद्र मोरे (970) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या साधना रवींद्र भालेराव (930), भाजपाच्या वर्षा गणेश जाधव (318) आदींचा पराभव केला. 27 मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला.

प्रभाग क्रमांक चार मधून भाजपा उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक चार ‘अ’ मधून भाजपा उमेदवार अर्चना विलास सातदिवे
(183) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्योती रवींद्र सपकाळे (110), अपक्ष अरुणाबाई सुरेश सुरवाडे (126), वंचितच्या सपना जितू संगेले (116) आदींचा पराभव केला. आठ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

पत्रकारांचा मिडीया कक्षावर बहिष्कार
भुसावळ पालिका निवडणुकीची सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर मिडीया कक्षात तासाभरानंतरही कुठलीही माहिती देण्यात आली नाही तसेच कक्ष असूनही कुठल्याही सक्षम अधिकार्‍यांची माहिती देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्याने माध्यमांनी तीव्र संताप व्यक्त केला. मतमोजणीस्थळी किमान एका माध्यम प्रतिनिधीला आत जाण्यास मनाई करण्यात आल्याने शहरातील सर्व प्रकारच्या माध्यमांना निवडणूक कक्षावर बहिष्कार टाकत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 30 वर्षांच्या निवडणूक काळात प्रथमच अशा पद्धत्तीची वागणूक मिडीया प्रतिनिधींना देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडे माध्यम प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

(याच बातमीत आम्ही सर्व प्रभागाची अपडेट माहिती देवू, लिंक रिफे्रश करा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!