Homeआरोग्यआयुक्त शेखर सिंह यांनी घेतली कुंभमेळा वेळी रेल्वे विभागाच्या नियोजनाची माहिती आणि...

आयुक्त शेखर सिंह यांनी घेतली कुंभमेळा वेळी रेल्वे विभागाच्या नियोजनाची माहिती आणि दिल्या सूचना!

कुंभमेळा यशस्वी व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे..

पोलीस वार्ता, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुरळीत व सोयीस्कर रेल्वे प्रवासासाठी रेल्वे विभागाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा आज दि.20 डिसेंबर रोजी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.

कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने भारतीय रेल्वेचे सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकसाठीचे व्यवस्थापन, अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे नियोजन, रेल्वे स्थानकांवरील सोईसुविधा, भाविकांची गर्दी नियंत्रण पद्धत, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.
कुंभमेळा यशस्वी व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सेवा, माहिती कक्ष तसेच आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ठरविलेल्या कृती आराखड्यानुसार सर्व संबंधित विभागांनी वेळेत कामकाज पूर्ण करावे, असे आयुक्तांनी सूचित केले. रेल्वे विभाग करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती अभियंता पंकज धावरे यांनी दिली.

यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक पो.आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडलचे वरिष्ठ मंडल अभियंता पंकज धावरे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, मोनिका राऊत, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह रेल्वे व इतर विभागांचे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!