भुसावळ (21 डिसेंबर 2025) भुसावळ पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा रविवारी सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आतापर्यंत भाजपाच्या उमेदवार रजनी सावकारे आघाडीवर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत रजनी सावकारे यांना तीन हजार 775 तर प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या गायत्री चेतन भंगाळे यांना तीन हजार 252 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या अन्सारी अर्शिया यांना 920 तर काँग्रेसच्या सविता सुरवाडे यांना 826 मते मिळाली असून 158 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक एक ‘अ’ मधून पूजा प्रेमचंद तायडे (1349) मतांनी विजयी झाल्या आहेत तर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती लक्ष्मण सोयंके (565), अपक्ष सीमा रुपेश धांडे (1180) पराभूत झाल्या तर 82 मतदारांना नोटाचा पर्याय स्वीकारला.
प्रभाग एक ‘ब’ मधून भाजपाचे गिरीश सुरेश महाजन (1462) मतांनी विजयी झाले. त्यांने शिवसेना शिंदे गटाचे अमोल मनोहर इंगळे (880), अपक्ष गिरीश पंडित पाटील (707), निलेश केशव महाजन (62) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी व भाजपा उमेदवाराचा विजय
प्रभाग दोन ‘अ’ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उल्हास भीमराव पगारे (1548) मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपा उमेदवार सविता रमेश मकासरे (1512), काँग्रेसच्या शुभांगी आनंद सोनवणे (331) मतांनी पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग दोन ‘ब’ मधून भाजपाच्या प्राची उदय पाटील (1295) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी पवार गटाच्या रत्नाबाई शांताराम जाधव (1039), अपक्ष उमेदवार ऐन्जिला रितेश नायके (50), अर्चना गणेश सपकाळे (915), मंगला विजय साळवे (99) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 58 मतदारांनी स्वीकारला.
प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक तीन ‘अ’ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताराम दत्तू सुरवाडे (1657) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी पवार गटाच्या आशा विशाल सपकाळे (672), वंचित आघाडीचे रुपेश रमेश गायकवाड (221), कविता सुनील ढिवरे (257), किर्ती सुरेश वानखेडे (80) यांचा पराभव केला. 20 मतदांनी नोटाचा वापर केला.
प्रभाग तीन ‘ब’ मधून काँग्रेसच्या काजल नरेंद्र मोरे (970) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या साधना रवींद्र भालेराव (930), भाजपाच्या वर्षा गणेश जाधव (318) आदींचा पराभव केला. 27 मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला.
प्रभाग क्रमांक चार मधून भाजपा उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक चार ‘अ’ मधून भाजपा उमेदवार अर्चना विलास सातदिवे
(183) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्योती रवींद्र सपकाळे (110), अपक्ष अरुणाबाई सुरेश सुरवाडे (126), वंचितच्या सपना जितू संगेले (116) आदींचा पराभव केला. आठ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
पत्रकारांचा मिडीया कक्षावर बहिष्कार
भुसावळ पालिका निवडणुकीची सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर मिडीया कक्षात तासाभरानंतरही कुठलीही माहिती देण्यात आली नाही तसेच कक्ष असूनही कुठल्याही सक्षम अधिकार्यांची माहिती देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्याने माध्यमांनी तीव्र संताप व्यक्त केला. मतमोजणीस्थळी किमान एका माध्यम प्रतिनिधीला आत जाण्यास मनाई करण्यात आल्याने शहरातील सर्व प्रकारच्या माध्यमांना निवडणूक कक्षावर बहिष्कार टाकत निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 30 वर्षांच्या निवडणूक काळात प्रथमच अशा पद्धत्तीची वागणूक मिडीया प्रतिनिधींना देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाकडे माध्यम प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
(याच बातमीत आम्ही सर्व प्रभागाची अपडेट माहिती देवू, लिंक रिफे्रश करा)






























