Homeआरोग्यदिपनगर औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील प्रकार; महिला कर्मचाऱ्याला अचानक पदावनती?

दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील प्रकार; महिला कर्मचाऱ्याला अचानक पदावनती?

सिस्टर पदावरून प्रथमोपचार पदावर पायउतार; वेतन रोख स्वरूपात दिल्याचा आरोप

भुसावळ : (निलेश.के.फिरके) तालुक्यातील दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र (महा जनको) रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत अचानक सिस्टर पदावरून प्रथमोपचार पदावर पायउतार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे महाजनकोच्या रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कर्मचाऱ्यांमध्येही दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कोरोना काळात दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या रुग्णालयात सिस्टर पदावर रुजू झाली होती. कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या या महिलेला रुजू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सूत्रांकडून करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या आदेशाला विरोध केल्यास नोकरी गमवावी लागेल, या भीतीपोटी संबंधित महिला त्रास सहन करत नियमितपणे कर्तव्य बजावत होती. मात्र अचानक १७ मे २०२६ रोजी वरिष्ठांनी कोणतीही स्पष्ट कारणे न देता तिची सिस्टर पदावरून प्रथमोपचार पदावर बदलीसदृश पदावनती केल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, संबंधित महिलेला नोकरीवर रुजू झाल्यापासून पीएफ, ईएसआय यांसारख्या मूलभूत शासकीय सुविधांचा लाभ देण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर तिचे मासिक वेतनही रोख स्वरूपात दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कामगार कायदे आणि कर्मचारी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाजनको प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास? ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी;अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापकांकडून मानसिक त्रास देत ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना...

जळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

0
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी पंटराविरोधात लाचखोरीचा गुन्हा भुसावळ - शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध...

पोलीस आयुक्तांकडून शहरात 12 जून मध्यरात्री पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये होणार कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक...

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याची ‘वसुली’ थांबवताच पदावनती?

0
कोरोना योद्धा सिस्टरला वरिष्ठांचा मानसिक छळ; वैद्यकीय अधिकारी व व्यवस्थापकांवर गंभीर आरोप भुसावळ (निलेश.के.फिरके)  तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र (महाजनको) रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला सिस्टरला...

error: Content is protected !!