Homeक्राईमघरातील सामान घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

घरातील सामान घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील स्टेट बँक मुख्य शाखेसमोरील परिसरात घरातील सामान घेण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित दीराविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी हर्षल सावकारे (वय २७, रा. मयुरेश्वर अपार्टमेंट, तुलसीधाम नगर) या दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता जामनेर रोडवरील सावकारे बिल्डिंगमध्ये घरातील सामान घेण्यासाठी गेल्या होत्या. इमारतीच्या जिन्याच्या गेटला कुलूप असल्याने त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या दीराकडे चावीची मागणी केली. मात्र, त्याने चावी देण्यास नकार देत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

यावेळी आरोपी मयूर संजयकुमार सावकारे (रा. सावकारे बिल्डिंग, जामनेर रोड) याने महिलेचा हात पकडून जबरदस्तीने स्वतःकडे ओढत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेत ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस पारसकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!