Homeक्राईमव्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे

भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत धडाकेबाज कारवाई करत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करून गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला आहे.

या प्रकरणातील मंगेश अंबादास काळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात खुनाचे कलम वाढविण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुंदन अनिल पठारे (वय १९, रा. वाल्मिक नगर, भुसावळ), रोहित उर्फ दादू संजय नवगिरे (वय २१, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) आणि एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या बालकास पुढील कार्यवाहीसाठी बाल निरीक्षक, जळगाव यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तपासादरम्यान आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवित लोखंडी रॉड, चॉपर, हॉकी स्टिक आणि लाकडी दांड्यांच्या सहाय्याने मंगेश काळे यांच्यावर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. तसेच एका आरोपीने पीडिताच्या पत्नीला गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाबही तपासात समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही प्रमुख आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!