Homeताज्या बातम्याभगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ..

पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. सत्ताधारी गटाकडून केवळ विरोधी गटाच्या नेत्यांनाच लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विक्रम सोनवणे यांनी केला आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी दि.10 सप्टेंबर 2026 रोजी एक पत्रक काढून नगर परिषद हद्दीतील रस्ते, चौक आणि पालिकेच्या जागांवर कोणतेही बॅनर लावण्यासाठी पूर्वपरवानगी आणि शुल्क भरणे बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा ही देण्यात आला आहे.

या धोरणाचे आम्ही स्वागतच करतो, पण कारवाई करताना दुजाभाव का? असा सवाल उपस्थित करत सोनवणे म्हणाले, “आम्ही गावाच्या विकासात कधीच आडवे येणार नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी खिलाडूवृत्ती दाखवावी. नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. या विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.”

दरम्यान, या आरोपांना मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी उत्तर दिले आहे. “शहरातील बॅनर आणि पोस्टरसाठी ठराविक नियमावली आहे. ज्या बॅनरची मुदत संपली आहे, तेच बॅनर नियमानुसार हटवले जातात. यामध्ये कोणत्याही गटाला किंवा पक्षाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात नाही. सर्वांसाठी समान नियम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे भगूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

यावर पुढे नेते विक्रम सोनवणे यांनी दिलेली प्रतिक्रिया….  आमचे बॅनर काढताना सांगितले “परवानगी नाही.”
मग आता सत्ताधाऱ्यांचे बॅनर कोणत्या परवानगीने चौकात झळकत आहेत? आम्ही घेतलेल्या माहितीनुसार, त्या बॅनरलाही परवानगी नसल्याचे समजते. मग नियम फक्त विरोधकांसाठीच आहेत का? भगूरच्या विकासाला आमचा विरोध नाही; पण नियम आणि कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. विरोधकांसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, हा दुजाभाव आम्हाला मान्य नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

error: Content is protected !!