Homeआरोग्यरंगपंचमीच्या दिवशी महिलेसोबत छेडछाड; गर्दीचा फायदा घेवून झाले होते तिघे फरार

रंगपंचमीच्या दिवशी महिलेसोबत छेडछाड; गर्दीचा फायदा घेवून झाले होते तिघे फरार

महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता..

पोलीस वार्ता, नाशिक : रंगपंचमी दिवशी म्हणजे दि.8 मार्च 2026 रोजी गर्दीचा फायदा घेवून एका महिलेची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. यावरून महिलेले दिलेल्या माहितीनुसार शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरूध्द गुरनं- 135/2026 भा.न्या.सं. कलम 74, 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा संवेदनशील असल्याने, नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.कर्णिक साहेब यांनी आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हा दाखल होताच त्याचा तपास करत असतांना शहर गुन्हे शाखा युनिट-1 च्या पोह.महेश साळुंके व पोअं.मुक्तार शेख यांनी दोन तासाच्या आत आरोपींची नावे निष्पन्न करून खबऱ्यांकडून माहिती मिळवली की, आरोपी हे तपोवन, आडगाव परिसरात येणार आहे, ही माहिती शहर गुन्हे शाखा युनिट-1 चे वपोनि. डॉ.अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनात श्रेणी पोउनि. किरण शिरसाठ, सपोउनि. कैलास चव्हाण, पोह. महेश साळुंके, प्रदीप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, विशाल देवरे, नाझीम पठाण, पोअं. गोरक्ष साबळे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांचे पथक तयार करून त्यांना तपोवन परिसरात आरोपींचा शोध घेण्यास पाठवले.
त्यावेळी पोलीस पथक शोध घेत असताना, तपोवन पंपीग स्टेशन परीसरात जाणाऱ्या मधल्या रोडवर सर्व आरोपी दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याची माहिती घेतली असता त्यांची नावे 1) सतिश लक्ष्मण वाघमारे (वय-20), रा- आम्रपाली झोपडपटी, उपनगर, नाशिक रोड 2) तुषार बाळु साळवे (वय-19), रा- रूक्मणी नगर, हनुमान नगर जवळ, लोखंडे मळा, जेलरोड, नाशिक रोड 3) ओम कुष्णा भांगरे (वय-21), रा- मु.काहांडोळ पाडा, पो. भुवन, ता. पेठ, जि नाशिक, अशी असल्याचे त्यांच्याकडून समजले. रंगपंचमीच्या दिवशी केलेल्या गुन्ह्याची त्यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे सर्व आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त(गुन्हे) संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. सुदाम सांगळे, रोहीदास लिलके, राजेश लोखंडे, जगेश्वर बोरसे यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!