सबंधित स्थानिक मंडल अधिकारी आणि तलाठी यांकडे विचारणा केली असता, त्यांनी या उत्खणनाबाबत कुठलीही ठोस माहिती नसल्याचे कबूल केले..
पोलीस वार्ता, सटाणा : बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथे मोठ्याप्रमाणात होणाऱ्या अवैधरित्या गौण खनिज उत्खणन आणि वाहतूकीची बाब समोर आली असताना आता त्याच विषयाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ढोलबारे येथील सर्वे नंबर 62/3 या क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात गौण खनिज उत्खणन आणि वाहतूक चालू असतानाच दि.25 फेब्रूवारी रोजी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या गौण खनिज उत्खणनबाबत सबंधित स्थानिक मंडल अधिकारी आणि तलाठी यांकडे विचारणा केली असता, त्यांनी या उत्खणनाबाबत कुठलीही ठोस माहिती नसल्याचे कबूल केले, सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरु करताच संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
राजरोसपणे सुरु असलेली गौण खनिज तस्करी महसूल प्रशासनाच्या नजरेतून सुटतेच कशी काय? अशी विचारणा केली असता त्यांना उत्तर देणे कठीण झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला तोही अर्धवट त्यामुळे शासनाला अपुरी माहिती पुढे जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या जागेवर हा अवैध गौण खनिज उत्खणनाचा प्रकार चालू होता ती जागा भोगवटादार वर्ग-2, कुळ खंड अधिकाराची असून या जागेच्या सातबारावर हस्तांतरण बंदीचा स्पष्ट उल्लेख आहे.
त्याबरोबरच पंचनाम्यातील नमुद बाबी आणि प्रत्यक्षातील तथ्य यांच्यात तफावत आढळून येत आहेत. ही तफावत म्हणजे शासनाची जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल, कारवाईसाठी ठेवलेल्या उणीवा असा त्याचा अर्थ निघण्याला वाव आहे. प्रत्यक्ष शेकडो ब्रास गौण खनिजाचे उत्खणन आणि तस्करी झाली असताना, पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात केवळ शंभर ब्रासचा उल्लेख करत शासनाची फसवणूक आणि तस्करांना वाचवण्याची खटाटोप अधिकाऱ्यांच्या कामातून दिसत येत आहे.
मुळात कायद्यातील तरतूदींनुसार भोगवटादार वर्ग-2 असलेल्या जमिनीवर अशा पद्धतीने अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि त्याची तस्करी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना, बागलाण महसूल यंत्रणेने कोणाच्या भल्यासाठी कामकाज चालविले आहे. हे कोडे जनतेला पडले आहे? शासनाची अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडूनच फसवणूक का केली जात आहे? शासकीय अधिकारी पदाचा गैरवापर करत देशाच्या, राष्ट्राच्या संपत्तीची लुटमार करणाऱ्यांसोबत मिळून भ्रष्टाचार करण्याचे चित्र सध्या बागलाण तालुक्यात दिसून येत आहे.
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला..
पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...