Homeआरोग्यहोमगार्ड संघटनेचा वर्धापन कार्यक्रम पुरुष व महिलांना सेवा जेष्ठता नुसार पदोन्नती आणि...

होमगार्ड संघटनेचा वर्धापन कार्यक्रम पुरुष व महिलांना सेवा जेष्ठता नुसार पदोन्नती आणि फुलांची रोपटे सप्रेम भेट

कार्यक्रमात वाहन चालवताना कोणकोणती काळजी घ्यावी या विषयी जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर होमगार्ड पथकातर्फे पथसंचलन करण्यात आले..

पोलीस वार्ता, नाशिक : गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड संघटनेच्या 15 डिसेंबर 2025 रोजी, 79 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक शहर होमगार्ड पथकांकडून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वाहन चालवताना कोणकोणती काळजी घ्यावी या विषयी जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर होमगार्ड पथकातर्फे पथसंचलन करण्यात आले, या पथसंचलनला होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण मा.आदित्य मिरखेलकर साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी नाशिक शहर होमगार्ड पथकातील पुरुष व महिलांना सेवा जेष्ठता नुसार पदोन्नती देण्यात आली तसेच त्यांचा सत्कार व त्यांच्या होमगार्ड सेवेचे कौतुक मा.प्रशासकीय अधिकारी सुरेशजी जाधव, मा.केंद्रनायक हरून तडवी, पलटण नायक शांतीलाल निनावे यांनी केले, नाशिक शहर समादेशक दिनेश पवार यांनी सर्व नाशिक शहर पथकातील होमगार्ड पुरुष जवान यांचा सत्कार करत त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देत पर्यावरणाचा संदेश म्हणून फुलांची रोपटे सप्रेम भेट दिली.
यावेळी नाशिक शहर पथकातील वरिष्ठ पलटणनायक श्रीकांत जाधव, रमेश कळमकर, प.नायक विनय शिंत्रे, सुमंत महाजन, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रशांत सुधाकर चौधरी, अभिषेक तांबडे, दिपक जाधव, मानसेवी शिक्षक चेतन गायकवाड, मनोज कनोजिया, संगीता सचिन पगारे, प्रशांत अवसरकर यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन इतरांना प्रेरणा दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष शेलार, विनोद वानखेडे, बाबासाहेब सोनवणे, मंगला तिवारी, माधुरी शिरसाट, मेघमाला जाधव, नसरीन शेख, गौतम जाधव यांसह नाशिकरोड बँड पथकातील सर्व होमगार्ड जवान कर्मचारी व नाशिक शहर होमगार्ड पथकातील जवान व महिला कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन मेहनत घेतली. याबद्दल दिनेश पवार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित होमगार्ड सैनिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!