Homeआरोग्यसुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात!

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात!

गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील 12 खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळेल..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून काढण्याच्या कामाला आज दि.11 मे 2026 रोजी सुरुवात झाली. बुबळी तलाव हा सुरगाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. गेल्या काही वर्षांत तलावात गाळ साचल्याने पाण्याच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरासह परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती.
आता गाळ काढण्याच्या कामामुळे तलावाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून शहरासह परिसरातील 12 खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळणार आहे. या गाळ काढण्यामुळे भविष्यात तलावात पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.
सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे, माजी नगराध्यक्ष तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुबळी तलावातील गाळ काढण्याबाबत चर्चा झाली. तलावाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमो फाऊंडेशनला आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र व्यवहार केला.
त्यानंतर सुरगाणा नगरपंचायतीने जलसंपदा विभागाशी समन्वय साधून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाने या कामासाठी समन्वय साधत कार्यवाही गतिमान केली असून, काम मान्सून आगमना आधी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!