Homeक्राईमसातपूर येथून चोरी गेलेली स्कॉर्पिओ 24 तासात गुन्हेशाखा युनिट-2 कडून आरोपीसह ताब्यात!

सातपूर येथून चोरी गेलेली स्कॉर्पिओ 24 तासात गुन्हेशाखा युनिट-2 कडून आरोपीसह ताब्यात!

शहर पोलीस पथकाने रुपये वीस लाख किंमतीची स्कॉर्पिओ वाहन हस्तगत केली आहे..

पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक करण्याचे आदेश शहर गुन्हे शाखा युनिट- 2 ला शहर पोलीस आयुक्त यांनी दिले होते.
त्यानुसार तपास करत असताना गुन्हेशाखा पोलीस पथकाच्या सपोउनि. गुलाब सोनार व पोअंम मनोज शिंदे यांना गुप्त बातमी मिळाली की, सातपुर येथील चोरीचा गु.र.नं 726/2026 भा.न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीचे महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ वाहन हे भावीन व्हील्स महिंद्रा सर्व्हिस सेंटर, सातपुर, नाशिक येथुन चोरीस गेले असुन ही चोरी संशयीत समाधान शिरोळे, रा. धारणगांव, ता. सिन्नर, जि. नाशिक याने केली असुन तो नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे.

सदरची बातमी शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे प्रभारी सपोनि. हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी गुप्त बातमीची खात्री करून पोलीस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोउनि. मुक्तारखान पठाण, सपोउनि. गुलाब सोनार, पोअं. मनोज शिंदे, प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार यांचे पथक तयार करून नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावण्यात आला. संशयित समाधान शिरोळे दिसताच त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने नाव समाधान अंबादास शिरोळे, वय-27 वर्ष, रा. मु. धारणगांव, पो. देवपुर, ता. सिन्नर, नाशिक असे सांगितले. पुढे त्यास चौकशीसाठी गुन्हेशाखा युनिट-2 च्या अश्विननगर येथील कार्यालयात आणून चौकशी केली. आरोपीने कबुली दिली की, दि.1 सप्टेंबर 2026 रोजी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी रागाच्या भरात चोरी करून नेली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रुपये वीस लाख किंमतीची स्कॉर्पिओ वाहन हस्तगत केली आहे. गुन्हेशाखा युनिट-2 च्या पथकाने 24 तासात गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक केली आहे.

ही कामगीरी शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक, उपआयुक्त मा.किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे मा.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हेशाखा युनिट-2 च्या पथकाने मिळून केली आहे. पथकात सपोनि डॉ.समाधान हिरे, पोह. प्रकाश महाजन यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

error: Content is protected !!