Homeआरोग्यसण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी वणी पोलीसांकडून शांतता समिती बैठकीचे आयोजन!

सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी वणी पोलीसांकडून शांतता समिती बैठकीचे आयोजन!

नवरात्री दुर्गा विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने काढून, डीजे(DJ) चा वापर टाळावा, तसेच पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याचे सुचवण्यात आले..

पोलीस वार्ता, वणी : शहर परिसरात आगामी सण-उत्सवांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्व सण शांततेत पार पडण्याच्या उद्देशाने वणी पोलीसांनी दि.20 सप्टेंबर 2025 रोजी, सकाळी 11 वाजता नवरात्र उत्सव पार्श्वभूमीवर मंडळांचे पदाधिकारी व सदस्य तसेच सामाजिक, राजकीय नेते व नागरिकांसाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते.

वणी पोलीस ठाण्याचे पोनि श्री गोपाल सुधाकर उंबरकर साहेब यांच्या मार्गदर्शनात ही बैठक संपन्न झाली. यावेळी नवरात्री दुर्गा विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने काढून, डीजे(DJ) चा वापर टाळावा, तसेच पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याचे सुचवण्यात आले.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे
• दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा.
• मिरवणुकीत कोणीही नशेत किंवा मद्यपान करून सहभागी होऊ नये.
• दिलेल्या मार्गाचे (Route) आणि वेळेचे तंतोतंत पालन करावे.

• विसर्जन घाटावर देवीचे विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.
• प्रत्येक दुर्गा मंडळाने नवरात्री उत्सवात मंडपात एक स्वयंसेवक पूर्णवेळ हजर ठेवावा.
• नवरात्री उत्सवात कोणत्याही मंडळाने आक्षेपार्ह पोस्टर किंवा बॅनर लावू नये.
या शिवाय बैठकीत, गावातील सर्व कार्यक्रम शांततेत पूर्ण संपन्न होण्यासाठी नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे, तसेच सर्व दुर्गा मंडळ सदस्यांनी डीजे. मुक्त मिरवणुका काढून विसर्जन शांततेत पूर्ण करावे. असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. वणी पोलीस ठाण्यात आयोजित या बैठकीसाठी सुमारे 170 ते 175 नागरिक उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता टीम : दिवाकर साखरकर, वणी (यवतमाळ)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!