विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रोजगार मेळावा होणार..
पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
मेळाव्याच्या दिवशी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या/ नियोक्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. सत्ताधारी...
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला..
पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...