Homeआरोग्यसरकारवाडा हद्दीतील ठक्कर बाजार-मेळा बसस्थानक परिसरातून आठ दुचाकी चोरणारा आरोपी अखेर शहर...

सरकारवाडा हद्दीतील ठक्कर बाजार-मेळा बसस्थानक परिसरातून आठ दुचाकी चोरणारा आरोपी अखेर शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून अटकेत!

आरोपीकडून एकूण 8 चोरीच्या दुचाकी मिळून 3,60,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरी तसेच गुन्ह्यातील फरार चोर, गुन्हेगारांचा तपास करणे व सराईतांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दि.13 सप्टेंबर रोजी दु. 5.25 वाजेपासून ते दि.14 सप्टेंबर दु. 2 वाजे दरम्यान फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी क्र- एमएच 15 ईएक्स 8771 ही ठक्कर बाजार परिसरात पार्क केली होती पण ती तिथून चोरी गेली यानुसार फिर्यादीच्या सांगण्यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुरनं- 255/2025 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास करत असताना शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोलीस पथकातील पोह. प्रशांत मरकड व प्रदिप म्हसदे यांना गुप्त माहिती मिळाली की, एक संशयित चोरीची टी.व्ही.एस कंपनीची मॅक्स 100, दुचाकी चालवत शहरातील सीबीएस कडून कॅनडा कॉर्नरच्या दिशेने जाणार आहे. या बातमीची खात्री करून ही माहीती शहर गुन्हेशाखा युनिटी-1 चे वपोनि. डॉ.अंचल मुदगल देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून पथकाने शरणपुरोड, पोलीस ग्राउंड समोरील बस स्थानकाजवळ सापळा लावून संशयित दिसताच त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले त्याने त्याचे नाव जाकीर अक्तार शेख (वय-40), रा- ईरमाईल बेकरी जवळ, खडकाळी भद्रकाली, नाशिक असे सांगितले. त्याला चोरीच्या दुचाकी बद्दल विचारले असता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या जवळून टीव्हीएस कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली.
आरोपीला आणखीन गुन्ह्यांची विचारणा केली असता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत आहे आणि तो फरार असल्याचे समोर आले. त्याने ठक्कर बाजार व मेळा बसस्थानक परिसरातून आणखीन 7 दुचाकी चोरी केल्या असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याच्याकडून एकूण 8 चोरीच्या दुचाकी मिळून 3,60,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीवरील 4 दुचाकी चोरीचे व 1 दरोड्याचा प्रयत्न असे एकुण 5 गुन्हे उघडकीस आले आहे ते पुढील प्रमाणे, 1) सरकारवाडा पोलीस ठाणे, गुरनं- 255/2025, गुरनं- 168/2025, गुरनं- 264/2025, गुरनं- 267/2025, 2) मुंबईनाका पोलीस ठाणे, गुरनं- 194/2025, आरोपीला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. सुदाम सांगळे, पोह. प्रविण वाघमारे, विशाल काठे, गाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, उत्तम पवार, रविंद्र आढाव, पोअं. अमोल कोष्टी, मुक्तार शेख, नगेश्वर बोरसे, चापोअं. समाधान पवार यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!