Homeताज्या बातम्यासिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी 'बोधचिन्हाचे' सह्याद्री अतिथीगृह येथे अनावरण!

सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ‘बोधचिन्हाचे’ सह्याद्री अतिथीगृह येथे अनावरण!

कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण आज दि.13 मे 2026 रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने लोगो/बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली.
यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 ‘बोधचिन्ह
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण 3,067 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.

  • हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे.
  • भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक.
  • त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती.
  • काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला ‘शिवलिंगा’च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात 14 मे मध्यरात्रीपासून 28 मे रात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 14 मे 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 28 मे 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश.. पोलीस वार्ता, नाशिक : शहर...

हिंगोली येथे चौथा सर्वधर्मिय विवाह सोहळा संपन्न..

0
हिंगोली (मीनाक्षी पोळ)  येथे आज दिनांक12 मे 2026 रोजी शहरातील हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथे संबोधी ॲकडमी महाराष्ट्र, सरस्वती महिला सेवाभावी संस्था व हिंगोली...

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल!

सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.. पोलीस वार्ता, पुणे : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

प्रभारी नगराध्यक्षा पदावरून भुसावळ पालिकेत वाद

0
(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान) भुसावळ : (निलेश.के.फिरके)  येथील  नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज...

error: Content is protected !!