Homeउद्योगमुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीच्या 30 दुचाकींसह चोरटे ताब्यात!

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीच्या 30 दुचाकींसह चोरटे ताब्यात!

चोरीच्या एकूण 30 दुचाकी, किंमत 25 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींसह दोन अल्पवयीन अटकेत..

पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुक्ताईनगर पोलिसांनी केला आहे. एकूण चोरीच्या 30 दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकींची एकूण किंमत सुमारे 25 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक मा.श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरींना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पथकाला दिले होते. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 273/2026 च्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी विशाल सुरेश सोनवणे (रा.पिंपरुड, ता.यावल) आणि कुंदन सुनिल महाले (रा.सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

चौकशीत संशयितांनी 30 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरीनंतर दुचाकी रेल्वे स्थानके व बसस्थानकांवरील पे-अँड-पार्कमध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करण्याची त्यांची कार्यपद्धती सुरू असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणाचा तपास करताना गुजरातमधील उधना (सुरत) तसेच महाराष्ट्रातील कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हा पेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही यशस्वी उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने केली. वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात ही कारवाई जिल्हा पोलिसांसाठी मोठे यश मानली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

error: Content is protected !!