Homeउद्योगपत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल!

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल!

सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे..

पोलीस वार्ता, पुणे : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. परंतु पत्रकार राम पाचकाळे यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने दाखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर राजगड पोलिसांनी FIR दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.28 एप्रिल 2026 रोजी सायं. सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास कापूरहोळ येथील हायवे रोड परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना पत्रकार राम पाचकाळे हे मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होते. त्यावेळी हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद काशिनाथ दळवी व त्यांचा मुलगा तसेच इतर संबंधित व्यक्तींनी त्यांना अडवून “येथे काय काम आहे, येथे येऊ नकोस” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याची घटना घडली होती तसेच पत्रकार पाचकाळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही माहिती तक्रारीत देण्यात आली होती.

या घटनेत सुरुवातीला राजगड पोलीस स्टेशनकडून अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटना गंभीर स्वरूपाची असून पत्रकाराच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करून मारहाण व धमकी दिल्याचा आरोप असल्याने गंभीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार राम पाचकाळे यांनी पोलिसांना केली होती.
दरम्यान, न्याय मिळत नसल्याचा आरोप करत राम पाचकाळे यांनी दि.11मे 2026 रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित राजगड पोलीस प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर पोलिसांनी संशयित आनंद काशिनाथ दळवी व त्यांचा मुलगा व इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध भा.न्या.संहिता(BNS) कलम 189(2), 191(2), 190, 115(2), 351(2)(3) व 352 अंतर्गत गु.र.नं. 182/2026 गुन्हा नोंदवला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे हवालदार राहुल कोल्हे करत आहेत.
या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्रकार संघटनांनीही या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!