Homeआरोग्यफैजपुर नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहर बनले घाणीचे साम्राज्य, लोकांचे आरोग्य धोक्यात!

फैजपुर नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहर बनले घाणीचे साम्राज्य, लोकांचे आरोग्य धोक्यात!

फैजपुर नगरपालिका अधिकारी त्यांची जबाबदारी झटकत असल्याकारणाने शहर घाणीच्या विळख्यात अडकडे आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ | यावल तालुक्यातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेले फैजपूर शहर हे सद्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. याला फैजपूर नगरपालिका जबाबदार असून लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न येथील पालिका नगराध्यक्ष व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा असल्याचा दिसून येत आहे. वेळोवेळी नागरिकांनी घाणीच्या संदर्भात तक्रारी व लेखी निवेदने देऊन देखील पालिका अधिकारी यावर आजपर्यंत कानाडोळा करत राहिले आहे.

फैजपुर नगरपालिका अधिकारी त्यांची जबाबदारी झटकत असल्याकारणाने शहर घाणीच्या विळख्यात अडकडे आहे. असा फैजपूर शहरासह तालुक्यातील जनतेचा आरोप आहे. दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार हा देखील पर्यायी जागा नसल्यामुळे ह्याच घाणीच्या परिसरात भरत असतो. परंतु नगरपालिका याकडे कुठल्याही गांभीर्याने लक्ष देत नाही.

पावसाळा सुरू झाला असून पावसाच पाणी या घाणीत साठून मच्छर व दुर्गंधी वाढली असून लवकरच रोगांमुळे शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या घाणीत विषारी किडे जंतू यांचा वावर वाढला आहे. घाणीमुळे पसरणाऱ्या रोगांमुळे कोणाचा जीव जाण्याची वाट पालिका नगराध्यक्ष व आरोग्य अधिकारी पाहत आहे का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे?

तरी जळगाव जिल्हाधिकारी यांनी या गंभीर समस्येवर लक्ष देऊन त्वरित उपाययोजना व कारवाई करण्याचे आदेश फैजपूर नगर परिषदेला द्यावे. अशी फैजपूर शहर वासियांची मागणी आहे. लोकांना आरोग्याबाबत समस्यांवर आंदोलन करण्यास भाग पाडू नये. आणि तशी वेळ आली तर शहरातील लोक पालिका विरोधी आंदोलन करण्यास रस्त्यावर उतरतील अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!