Homeउद्योगपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शहरात 22 मे रोजी आयोजन!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शहरात 22 मे रोजी आयोजन!

मेळावा शुक्रवार दि.22 मे 2026 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक येथे..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यावतीने शुक्रवार दि.22 मे 2026 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक या ठिकाणी ‘शिका आणि कमवा’ या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहा. आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

या मेळाव्यात टोयोटो-किर्लोस्कर मोटरच्या शिका व कमवा उपक्रमांतर्गत 50 विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टोयोटो-किर्लोस्कर मोटरचे एच.आर. मॅनेजर व प्रतिनिधी प्रत्यक्ष या मेळाव्यात उपस्थित राहून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्या सहकार्याने उमेदवारांना जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंम्ब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन यासारखे विविध तांत्रिक कोर्सेस उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून प्रशिक्षण दरम्यान पहिल्या वर्षी रूपये 15 हजार 800 आणि दुसऱ्या वर्षी रूपये 17 हजार सहाशे विद्यावेतन दिले जाणार आहे. यासोबतच उमेदवारांची निवास सुविधा, संगणक कक्ष, क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यांनतर गुणवत्तेच्या आधारे संबंधित कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी 18 ते 21 वर्षे वयोगटातील इयत्ता 10 वी, 12 वी व बीकॉम उत्तीर्ण उमेदवार पात्र असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहा. आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच...

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; खंडणी-खून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय...

मनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका 20 जून रोजी.. पोलीस वार्ता, नाशिक...

विनाकारण कॉल करणाऱ्यास न्यायालयाने सुनावली शिक्षा

0
नंदुरबार, ता. २२ : डायल ११२ वर विनाकारण कॉल करून पोलिस यंत्रणेला त्रास दिल्याप्रकरणी एका व्यक्तीस न्यायालयाने ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा मुदत वाढ अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत..

1 जुलै 2026 पासून एच.एस.आर.पी. प्लेट नसलेल्या सर्व जुन्या-नव्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार.. पोलीस वार्ता, नाशिक : सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी...

error: Content is protected !!