Homeआरोग्यशेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई..

पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कृषी विभागामार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम सुरू केली आहे. या तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने 17 संबंधित कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी e-POS यंत्राद्वारे व्यवहार करताना कंपनीकडून प्राप्त झालेले Acknowledgement वेळेत स्वीकारले नसल्याचे निदर्शनास आले. तसेच e-POS प्रणालीतील साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये तफावत, रोख वह्या व स्टॉक नोंदवहीतील विसंगती, खत वितरणाबाबत आवश्यक नोंदी न ठेवणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळल्या. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली. अशी माहिती परवाना अधिकारी तथा माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.
जिल्ह्यात 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत खत, बियाणे, कीटकनाशक विक्रीशी संबंधित विविध अनियमिततांमुळे एकूण 86 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी सेवा केंद्रांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ठ दर्जाच्या निविष्ठांची विक्री, निर्धारित दरापेक्षा जादा दराने विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शेतकऱ्यांना शासनाचे आवाहन
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल घेणे बंधनकारक असून e-POS यंत्राद्वारेच व्यवहार होत असल्याची खात्री करावी. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमबाह्य व्यवहार, जादा दर आकारणी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधित पंचायत समितीतील कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या 7821032408 या क्रमांकावर किंवा WhatsApp द्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अधिकारी माने यांनी केले आहे.
  • संपर्कासाठी कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण यांचे शासकीय मोबाईल क्रमांक..

1. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, नाशिक, मोबाईल नंबर- 📞9185215369
2. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, इगतपुरी, मोबाईल नंबर- 📞9185215629
3. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, त्र्यंबकेश्वर, मोबाईल नंबर- 📞9185215400
4. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, पेठ, मोबाईल नंबर- 📞9185215487
5. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, निफाड, मोबाईल नंबर- 📞9011619675
6. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, सिन्नर, मोबाईल नंबर- 📞9185215128
7. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, येवला, मोबाईल नंबर- 📞9185215584
8. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, चांदवड, मोबाईल नंबर- 📞9185215172
9. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, कळवण, मोबाईल नंबर- 📞9185215274
10. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, देवळा, मोबाईल नंबर- 📞9185215305
11. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, दिंडारी, मोबाईल नंबर- 📞9185215228
12. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, सुरगाणा, मोबाईल नंबर- 📞9185215324
13. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, मालेगाव, मोबाईल नंबर- 📞9185215517
14. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, बागलाण, मोबाईल नंबर- 📞9185215066
15. कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, नांदगाव, मोबाईल नंबर- 📞9185215021
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!