Homeक्राईमभुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; ५ कोटींच्या खंडणी-खून प्रकरणातील संशयिताला आश्रय?

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; ५ कोटींच्या खंडणी-खून प्रकरणातील संशयिताला आश्रय?

नगरसेवकांच्या पुतण्याची चौकशी; आधार कार्ड बनवून दिल्याचीही चर्चा

भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी व खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ओडीसा पोलिसांचे विशेष पथक थेट भुसावळात दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरील संशयितावर तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीसह खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडीसा पोलिसांनी शहरातील एका अपार्टमेंटवर छापा टाकत संबंधित अपार्टमेंट मालकाची कसून चौकशी केली. विशेष म्हणजे संबंधित अपार्टमेंट मालक हा एका नगरसेवकाचा पुतण्या असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असतानाही त्याला वास्तव्यास ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे.

इतकेच नव्हे तर संशयित आरोपीसाठी आधार कार्ड बनवून देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही सूत्रांकडून समोर येत आहे. पथकाला अपार्टमेंटमधून संशयित आरोपीशी संबंधित आधार कार्ड मिळाल्याची माहिती मिळाल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे.

ओडीसा पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने अपार्टमेंट मालकाची दीर्घ चौकशी केली. “५ कोटींच्या खंडणी आणि खून प्रकरणातील संशयिताला नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून आश्रय देण्यात आला?”, “यामागे आणखी कोणाचा हात आहे का?” याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, संशयित आरोपी काही दिवसांपूर्वी सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती अपार्टमेंट मालकाने पोलिसांना दिल्यानंतर ओडीसा पोलिसांचे पथक संशयिताच्या शोधार्थ सुरतकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. शहरात मात्र या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!