विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून नको ते कृत्य तिच्यासोबत करत..
पोलीस वार्ता, धरणगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशियत शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संबधीत पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक मराठे हा विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे व नको ते कृत्य तिच्यासोबत करत असे. सकाळी शाळेत कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत असे. इतकेच नव्हे तर तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा लैंगिक छळ करत असल्याचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला आहे. 30 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशी देखील या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. सततच्या छळाला कंटाळून पीडित विद्यार्थीनेने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.



























